पिंपरी-चिंचवड

विजेतेपदासाठी अधिराज, शौर्य यांच्यात लढत

CD

पुणे, ता. १५ ः पुनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स टेनिस स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात ‘न्यू इंडिया’च्या अधिराज दुधाणे आणि ‘अभिनव’च्या शौर्य गडदे यांच्यात विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे. मुलांच्या १२ वर्षांखालील गटातील दुसऱ्या फेरीत वियान गोयल (सिंबायोसिस), अभिमन्यू चव्हाण (महेश विद्यालय), रिदित नवले (विद्या व्हॅली), मौर्य पानसे (एसपीएम पब्लिक) यांनी विजयी आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्टवर वरील स्पर्धा चालू आहे. स्पर्धेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटात शनिवारी उपांत्य फेरी; तर १२ वर्षांखालील गटाच्या पहिल्या दोन फेऱ्या झाल्या. १४ वर्षांखालील गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात अधिराज दुधाणे याने इंद्राणी इंटरनॅशनल स्कूलच्या आर्यन बॅनर्जीवर ६-१ असा सहज विजय मिळविला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात शौर्य गडदे याने बाल शिक्षण स्कूलच्या अर्णव पांडे याला ६-२ असे नमविले.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत शौर्य याने आरव बेले (न्यू इंडिया स्कूल) याला ६-५ (४) असे पराभूत केले. तर दुसऱ्या सामन्यात अर्णव पांडे (बाल शिक्षण) याने वदूद कैफी (ट्री हाऊस) याला ६-१ असे सहज हरविले. अन्य एका लढतीमध्ये अधिराज दुधाणे याने आरव मुदनूर (विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक) याच्यावर ६-० असा एकतर्फी विजय मिळविला. तर आर्यन बॅनर्जी (इंद्राणी इंटरनॅशनल) याने वीर गायकवाड (ग्रीनवुडस्) याच्यावर ६-४ अशी संघर्षपूर्ण मात केली.
मुलांच्या १२ वर्षांखालील गटात दुसऱ्या फेरीत वियान गोयल याने निलय बंबे (विबग्योर राइज) ४-० अशी मात केली. दुसऱ्या सामन्यात अभिमन्यू चव्हाण याने अमेय कावळे (नॉलेज हॅबिटॅट) याला ४-१ असे पराभूत केले. तिसऱ्या लढतीमध्ये रिदित नवले याने मनतव्य शर्मा (एल्प्रो इंटरनॅशनल) याच्यावर ४-२ असा विजय मिळविला. तर अखेरच्या सामन्यात मौर्य पानसे याने क्षितीज प्रसाद (बिशप्स को-एड) ४-२ असे हरविले.


नामांकित खेळाडूंचा सहभाग
या टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात अहान जैन, अद्वैत गुंड, आर्यन बॅनर्जी, अर्णव भट्ट, अर्णव पांडे, अरिंजय बंग, आरव मुदनूर, आरव बेले, पलश जैन, अद्वय संगावकर, वीर गायकवाड या नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला; तर १२ वर्षांखालील गटात अहन भट्टाचार्य, श्लोक अलांद, कुमार कौटिल्य, आदित्य उपाध्ये, अभिमन्यू चव्हाण, रिदित नवले, वियान गोयल, क्षितीज प्रसाद या नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत.


‘सकाळ स्कूलिंपिक्स’च्या टेनिस स्पर्धेत मुलाने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला. स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- विक्रम राऊत, पालक

‘सकाळ’ची ‘स्कूलिंपिक्स’ स्पर्धा मुलांसाठी मह‍त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या स्पर्धेमुळे मुलांना खेळाप्रती प्रोत्साहन मिळत आहे. अत्यंत सूक्ष्म नियोजन करून या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. सगळे सामने वेळेत पार पडले.
- काजल गोयल, पालक

‘स्कूलिंपिक्स’ स्पर्धेत सहभागी होण्याची माझे तिसरे वर्ष आहे. मी शालेय स्पर्धेमधील १२ आणि १४ वर्षे वयोगटांत राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा शिस्तबद्ध नियोजनात भरविण्यात येते. त्यामध्ये अनेक नामांकित खेळाडू सहभागी होत असतात. त्यामुळे ही स्पर्धा माझ्यासारख्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचे ठरते.
- शौर्य गडदे, टेनिसपटू (अभिनव विद्यालय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT