पिंपरी-चिंचवड

शालेय समित्यांची माहिती भरण्यास निरुत्साह

CD

आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शालेय स्तरावर समित्यांचे एकत्रीकरण करून चार समित्या स्थापन करण्याचा निर्णश शासनाने घेतला आहे. याची माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे. यात पुणे जिल्ह्यातील तीन हजारांपैकी केवळ ५७५ शाळांनी नोंद केली आहे. त्यामुळे माहिती भरण्यास शाळा टाळाटाळ करत असल्याची स्थिती आहे.
शाळा व्यवस्थापन, परिवहन, शाळा बांधकाम , तक्रार पेटी , सखी सावित्री, महिला तक्रार निवारण, विद्यार्थी सुरक्षा, तंबाखू संनियंत्रण, नवभारत साक्षरता, शाळा व्यवस्थापन विकास, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर, स्वयं मूल्यांकन समिती आणि माता पालक संघ आणि पालक शिक्षक संघ आणि पोषण आहार या १५ समित्यांचे एकत्रीकरण करून शाळा व्यवस्थापन, सखी सावित्री, महिला तक्रार निवारण/अंतर्गत तक्रार, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन या चारच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्वांची माहिती भरण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि वेळखाऊ झाल्याचा दावा शाळांचे व्यवस्थापन करत आहे. शिवाय, ही माहिती भरण्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अध्ययन-अध्यापनासाठी आणि इतर कामांसाठी अधिक वेळ लागत आहे. ज्यामुळे प्रशासकीय कामांचा बोजा वाढल्याचे मुख्याध्यापक सांगत आहेत.
दरम्यान, शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ देता यावा, त्यांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देता येईल, शिक्षक आणि मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी अधिक संधी देऊ शकतील. शालेय कामकाज अधिक सुलभ होईल, समित्यांचे अधिक चांगले व्यवस्थापन होईल यासाठी या समित्यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहेत.


समस्येची कारणे :
एकत्रित समित्यांची गुंतागुंत : अनेक समित्यांचे एकत्रीकरण झाल्यामुळे माहिती भरण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि वेळखाऊ
प्रशासकीय कामांचा बोजा : मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना माहिती भरण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो, त्यामुळे त्यांच्या अध्यापनाच्या वेळेवर परिणाम होतो.
माहिती भरण्यासाठी दिरंगाई : अनेक ठिकाणी, माहिती भरण्याच्या प्रक्रियेत टाळाटाळ किंवा दिरंगाई दिसून येते, ज्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण होतो.

पुणे जिल्ह्यात ५७५ शाळांनी या समित्यांची नोंद केली आहे. एक वेळा भरलेली माहिती दुरुस्त करता येणार नाही याची नोंद घेऊन माहिती भरावी त्वरित माहिती भरून घ्यावी. त्यानुसार या पाच समित्यांचे अध्यक्ष व सचिव यांचे नाव व मोबाइल नंबर माहिती दिलेल्या लिंकवर भरावी.
- डॉ.भाऊसाहेब कारेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railways Food Courts: रेल्वेकडून केटरिंग धोरणात मोठा बदल! आता केएफसी आणि मॅकडोनाल्ड्स सारखे फूड ब्रँड स्थानकांवर उघडणार, पण कधी?

Sangamner News:'संगमनेर तालुक्यात आठ दिवसांत १९२ वनराई बंधाऱ्यांची निर्मिती'; ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ प्रभावी, पाणीपातळीत वाढ

Chakan News : चाकणमध्ये महामार्गावरून दररोज हजारो कंटेनर-ट्रेलरची वाहतूक; नवले पूल दुर्घटनेच्या पुनरावृत्तीचा धोका!

Latest Marathi Breaking News Live : लाल किल्ला स्फोट प्रकरणात आमिर रशीद अलीला अटक

Inspiring Achievement:'पॅरा कमांडो समाधान थोरातचे उल्लेखनीय यश'; गोवा हाफ आयर्नमॅन स्पर्धा ५ तास २८ मिनिटांत पूर्ण..

SCROLL FOR NEXT