पिंपरी-चिंचवड

तरुणांना मिळाले कौशल्याचे ‘पंख’

CD

पिंपरी, ता. १७ ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत लाइट हाऊस संस्थेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमाने शहरातील तरुणांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. मागील पाच वर्षांत तब्बल १० हजार ४७ युवक-युवतींना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना स्थिर उत्पन्नाचे साधन मिळाले असून शहरातील उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ मिळाले आहे. कौशल्य प्रशिक्षण योजनेतंर्गत शहरातील सुशिक्षित बेरोजगार तसेच शिक्षित युवकांना विविध क्षेत्रातील कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. ऑफिस एक्झिक्युटिव्ह, टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग, सीएनसी प्रोग्रॅमिंग, ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट, फिटनेस आणि न्यूट्रिशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व प्रोग्रॅमिंग, डिजिटल मार्केटिंग, लॉजिस्टिक यांसारख्या अनेक कोर्सेसचा समावेश या प्रशिक्षणात आहे. याशिवाय, लाईट हाऊस केंद्रांमध्ये अतिरिक्त कोर्सेसद्वारेही विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची संधी दिली जाते.
मार्च २०२१ ते ऑक्टोबर २०२५ या काळात तब्बल १० हजार ४७ युवकांनी लाइट हाऊसमध्ये व्यावसायिक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. पायाभूत अभ्यासक्रमांच्या (फाउंडेशन कोर्सेस) माध्यमातून प्रथम त्यांना व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश आणि डिजिटल एम्पॉवरमेंट यांचे प्रशिक्षण देऊन पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सक्षम केले. यापैकी ३ हजार ४३५ युवकांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक कौशल्ये आत्मसात केली. तसेच, ४ हजार ८०७ युवकांना शहरातील विविध औद्योगिक कंपन्या, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये रोजगार मिळवून देण्यात आला आहे.

टॉप टेन कौशल्य विकास प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी (कोर्सनिहाय संख्या)
- ऑफिस एक्झिक्युटिव्ह : ६९६
- टेलरिंग अॅण्ड फॅशन डिझायनिंग : ३३६
- सीएनसी प्रोग्रॅमर : ३०८
- ब्युटिफिकेशन अॅण्ड मेकअप आर्टिस्ट : २३२
- फिटनेस अॅण्ड न्यूट्रिशन : २१८
- अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह : १९७
- नर्सिंग असिस्टंट : १७०
- सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अॅण्ड प्रोग्रॅमिंग : १६९
- डिजिटल मार्केटिंग : १२०
- लॉजिस्टिक्स : ९२

--------
लाइट हाऊसमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण
ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन, फायनान्शियल अकाउंटिंग विथ टॅली, डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझायनिंग, मोबाईल रिपेअरिंग, जावा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, अॅंग्युलर, पायथॉन, नर्सिंग, ए. सी. रिपेअरिंग, फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर, मेकअप आर्टिस्ट, जिम (फिटनेस) ट्रेनर आदींचे प्रशिक्षण लाइट हाऊसमध्ये दिले जाते.


महापालिका आणि लाइट हाऊस यांच्या कौशल्य विकास उपक्रमामुळे उत्तम संवादकौशल्य आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळाले. यामुळे आवडता स्किलिंग कोर्स करण्याची संधी मिळाली आणि आज मी स्वयंरोजगारासाठी सक्षम झालो आहे.
-देवेंद्र कांबळे, प्रशिक्षणार्थी
------
लाइट हाऊसमध्ये मुलींसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. सुरुवातीला कोणता कोर्स निवडावा याबाबत संभ्रम होता. मात्र, येथे
मिळालेल्या योग्य करिअर मार्गदर्शनामुळे योग्य कोर्स निवडणे आणि तो पूर्ण करणे सोपे झाले.
- पूजा गायकवाड, प्रशिक्षणार्थी
-------
प्रत्येक युवकाला कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे. अधिकाधिक बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
- लखन रोकडे, सहायक व्यवस्थापक, लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन
--------
रोजगारक्षम कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि योग्य मार्गदर्शन यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक युवकाला उद्योगजगतासाठी तयार करत आहोत. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवकांना संधीच्या मुख्य प्रवाहात आणणे आमचे प्राथमिक ध्येय आहे.
-ममता शिंदे, उपायुक्त, समाज विकास, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT