सकाळ संवाद
जलवाहिनीची गळती थांबवावी
पाचपीर चौक, काळेवाडी येथील जलवाहिनीमध्ये वारंवार गळती होत आहे. वाहिनी जुनी किंवा उष्णतेमुळे खराब होणे यांसारखी कारणे असू शकतात. यावर उपाय म्हणून, संबंधित प्रशासनाने गळतीची तपासणी करणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
-ज्ञानेश्वर मलशेट्टी, काळेवाडी
PNE25V68574
----------------------------------
चिंचवडे नगरमधील कचरा उचलावा
चिंचवडे नगर येथील डिस्ट्रिब्युशन बॉक्स (डीपी) अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. कचऱ्यास आगी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा कचरा उचलण्याची गरज आहे. तेथे कचरा कोणीही टाकू नये असे कर्मचारी सांगतात तरीही कचरा टाकला जातो.
-सुहास कुलकर्णी, चिंचवडे नगर
PNE25V68571
---------------------------------
पाइप टाकण्याचे काम स्वागतार्ह
तळेगाव यशवंतनगरमध्ये सध्या गटाराचे पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. हे स्वागतार्ह आहे. त्यामळे परिसर स्वच्छ राहील. परंतु हे सर्व यशवंत नगरमध्ये होणार आहे असे समजावे का? कारण हे मध्येच कुठेतरी सुरू आहे. जयभवानी दुकानाच्या आसपासचे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. आता दत्त जयंतीच्या वेळी तिथे बरीच गर्दी होईल. वाहन चालविणे व चालणे सुद्धा धोकादायक होते.
-प्रकाश दातार, यशवंत नगर
PNE25V68572
---------------------------------
महाबली चौकात वाहतुकीस अडथळा
शाहूनगर येथील नक्षत्र फेज वन ते महाबली चौक येथे वाहने विशिष्टपणे लावली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. नागरिकांनी जर या मालवाहू गाड्यांच्या मालकांशी बोलले तर ते उद्धटपणे बोलतात.
ज्या दुकानासमोर ऑटो येतात. त्या दुकानदारांनी ही जबाबदारी घेऊन त्यांना समज दिली पाहिजे. जेणेकरून ट्रॅफिकचे अडथळे दूर होतील आणि कुठली दुर्घटना होणार नाही.
-विनय खेडकर, शाहूनगर चिंचवड
PNE25V68575
----------------------------------------
बीआरटी मार्गावर हवी सुरक्षितता
नुकताच अहमदाबाद शहरात बीआरटी बसने प्रवास करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. एक तर बीआरटी थांब्यावर प्रवाशांसाठी असलेले स्वयंचलित दरवाजे. दुसरी गोष्ट स्वच्छता, आधुनिकता, तिकीट देणारा अधिकारी, बसमार्गांची माहिती, प्रशस्त जागा. बसमध्ये कंडक्टर नसतो. बीआरटी थांब्यावर तिकीट मिळते. अधेमधे तिकीट तपासनीस असतातच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बसमार्गात आणि पादचारी मार्गात असलेले स्वयंचलित गेट. एरवी हे गेट बससाठी बंद असते. बस आल्यावर हे गेट उघडते आणि आपोआप पादचाऱ्यांसाठी बंद होते. पिंपरी ते निगडी मार्गावर मेट्रोच्या कामानंतर बीआरटी मार्गाचे आधुनिकीकरण होणार आहे. त्यासाठी अशा आधुनिक आणि सुरक्षितता वाढवणाऱ्या गोष्टींचा विचार करावा. नंतर सर्वच बीआरटी मार्गांवर अशा सुधारणा करता येतील.
-शिवराम वैद्य, निगडी,
PNE25V68576
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.