पिंपरी-चिंचवड

अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे ‘नजर’

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात आठ हजार २२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारले आहे. याद्वारे गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या चौकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मार्चअखेर उर्वरित भागात ७३८ कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. शिवाय, जानेवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. त्यांचे काम सुरू असून, नवीन सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे. यामुळे वाहतूक नियमांचे पालन, अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नजर राहणार आहे.
शहरात बांधकामे, रस्त्यांचे जाळे विस्तारते आहे. लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे. नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त जीवन जगता यावे म्हणून महापालिकेकडून शहराच्या कानाकोपऱ्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.

आतापर्यंतचे कॅमेरे
- महापालिकेने पहिल्या टप्यात रेल्वे स्थानके, मुख्य चौक, प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने, बीआरटी मार्ग अशा जवळपास ६४० ठिकाणी दोन हजार ४९० कॅमेरे बसविले
- दुसऱ्या टप्यात ६९० ठिकाणी दोन हजार ५२२ कॅमेरे बसविले
- स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गतही वोक्सारा टेक्नो सोल्यूशन कंपनीच्या सहकार्याने ८९० ठिकाणी तीन हजार १० कॅमेरे बसविले

असे आहेत कॅमेरे
- एएनपीआर आरएलव्हीडी प्रकारात मोडणारे अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडून ३६० अंशांमधील घडामोडी २४ तास चित्रित होतात
- संपूर्ण प्रणालीवर देखरेखीसाठी निगडीत नियंत्रण कक्ष (कमांड कंट्रोल सेंटर) कार्यान्वित
- सीसीसी कक्षातून कॅमेरांद्वारे अपघात, आक्षेपार्ह गोष्टींवर करडी नजर

तीन महिन्यांत ७३८ कॅमेरे बसविणार
महापालिकेकडून २,९६० कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत २,५२२ कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित ४३८ कॅमेरे जानेवारी अखेरपर्यंत बसवून एक एप्रिल २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ३,३१० कॅमेरे बसविण्याचे नियोजन असून, ७२० ठिकाणी ३,०१० बसविले आहेत. उर्वरित ३०० कॅमेरे फेब्रुवारी अखेरपर्यंत बसविण्याचे नियोजन आहे.

कॅमेरांची पोलिसांना मदत
शहरात विविध ठिकाणी झालेले अपघात व विविध आक्षेपार्ह घटना कॅमेरात झालेल्या चित्रीकरणामुळे उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनाही याची मदत होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी विविध तक्रारी निकाली काढण्यास मदत झाली आहे.  

आता ऑनलाइन चलन
शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बहुतांश वेळा अपघात झाल्याचे उघड झाले आहे. भरधाव वेगाने, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, चौकातच वाहन पार्किंग करणे अशा विविध नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत १२१ चौकात बसविलेल्या कॅमेरांद्वारे आता वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवर ई-चलनाद्वारे दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू असून, लवकरच प्रायोगिक तत्त्वावर काही रस्त्यांवर अंमलबजावणी केली जाणार आहे.

शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारी घटनांचा तपास करणे सोपे झाले आहे. अपघातातील दोषींची माहिती उघड होते. उर्वरित सीसीटीव्ही देखील आगामी दोन महिन्यांत बसविण्यात येणार आहेत.

- अनिल भालसाखळे, सहशहर अभियंता, महापालिका

शहरात स्मार्टसिटीअंतर्गत तीन हजारांहून अधिक कॅमेरे बसवून झाले आहेत. बीआरटीएस मार्गांवरील कॅमेऱ्याच्या केबल चोरी होत असल्यामुळे त्या ठिकाणी कॅमेरे बसविणे बाकी आहे. या सर्व सीसीटीव्हीमुळे नागरिकांची सुरक्षा वाढली आहे.
- कन्हान विजय, महाव्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी, स्मार्ट सिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

X Down : ट्वीटर बंद पडलं! जगभरात X डाऊन..युजर्सचा संताप

New Exam Rules: विद्यार्थ्यांनो दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची भीती सोडा! यंदा अनुत्तीर्ण होणे जवळपास अशक्य, 'या' नवीन नियमामुळे टेन्शन कमी झालं

प्राजक्ता माळीने हातावर गोंदवलं 'या' खास व्यक्तीचं नाव, कोण आहे ती व्यक्ती माहितीय? स्वत:च केलेला खुलासा

Babar Azam: चुकीला माफी नाही! बाबर आझमला ICC ने सुनावली शिक्षा, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Latest Marathi Breaking News : मनमाडमध्ये सराफा बाजार बंद; लहान मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

SCROLL FOR NEXT