पिंपरी-चिंचवड

वाचक लिहितात

CD

वाचक लिहितात
कुटुंबासाठी मतदान केंद्रही एकच हवे
मतदारांचे मतदान त्याच प्रभागात राहील अशी दक्षता घेण्यास निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे एकाच कुटुंबातील मतदान एकाच केंद्रात असावे याचीही दक्षता घ्यावी, असा मुद्दा मांडावासा वाटतो. अन्यथा मतदान केंद्र वेगळे असल्यास ते गैरसोईचे ठरेल.
- कमलाकर कुलकर्णी, पुनावळे
---
रिक्षा स्टँडची सुविधा का नाही ?
सकाळ टुडेमध्‍ये ‘अपुऱ्या फिडर बसमुळे फावतेय रिक्षावाल्याचे’ ही बातमी वाचली. मेट्रो स्थानकजवळ पीएमपीने फेऱ्या वाढविणे आवश्‍यक आहे. ‘ओला, उबेर’मुळे प्रवाशांची लुट होते. दुसरीकडे २५ वर्षांपूर्वी रिक्षा परवाने बंद आहेत. ओला उबेरच्या रिक्षांचे मीटर सुरू असेल तर ही मीटर का बंद? पिंपरी-चिंचवड महापालिका रिक्षा स्टँड का सुरु करीत नाही ? नवी मुंबईत रिक्षा स्टँड आहेत. आपल्या महानगरपालिकेरकडून ही सुविधा का नाही ?
- विजय निकाळजे, निगडी-प्राधिकरण
---
घंटा गाडीची प्रतिक्षा करणे भाग
पिंपळे निलखमधील पंचशीलनगर, टकलेनगरमध्ये कचरा घेऊन जाणारी घंटा गाडी सलग दोन-तीन दिवस येत नाही. रोजची वेळ निश्चीत नसल्याने प्रतिक्षा करणे भाग पडते. त्यामुळे कचरा साचून नागरिक त्रस्त होतात. घंटा गाडी कचरा नेण्यासाठी रोज व नियमित यावी. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांनी याची दखल तातडीने घ्यावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख
---
चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरजवळ जिजाऊ पर्यटन बाग आहे. तेथील झाडांवरील वटवाघळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आमचे घर वरच्या मजल्यावर आहे. काही वेळा वटवाघळे सायंकाळी उडतात तेव्हा भीती वाटते. तरी वटवाघळांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. आजी-माजी नगरसेवकांनी या प्रश्नाची नोंद घ्यावी.
- सुलभा भालचंद्र परब, चिंचवडगाव
---
अवजड वाहनांबाबत नियम धाब्यावर
मनाई असलेल्या रस्त्यांवर कुठल्याही वेळी अवजड वाहने सर्रास दिसतात. ही वाहने जाताना दुचाकी किंवा चारचाकी असली तरी भीती वाटते. ‘माय कार शोरूम’पासून डावीकडे भूमकर चौक, हिंजवडीच्या दिशेने, कस्तुरी चौकाकडे अशी अवजड वाहने धावतच असतात. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. प्रशासनाने याची दखल घेतलीच पाहिजे. कोणत्याही अवजड वाहनाबाबत संबंधित मंडळी वेळ, वेग आणि नियम धाब्यावर बसवितात.
- सचिन वरघडे, हिंजवडी
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT