पिंपरी-चिंचवड

अतिक्रमणे, अस्वच्छतेने मैदानांचीच ‘दमछाक’

CD

पिंपरी, दि. १४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या मैदानांची सध्या दुरवस्था झाली आहे. प्रामुख्याने अतिक्रमणे, गवताची वाढ व अस्वच्छता यामुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावत असतानाही त्यांना सुविधा पुरविण्याकडे काणाडोळा करत आहे, असा आरोप खेळाडू आणि पालकांनी केला आहे.
महापालिकेची काही मैदाने पूर्ण दिवसासाठी भाडेतत्त्वावर दिली जातात. यात मोकळे मैदान असेल, तर त्यासाठी संपूर्ण दिवसाचे शुल्क आकारले जाते. तर, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस कोर्टसाठी तासिका तत्वावर भाडे आकारले जाते. त्यातून उत्पन्न मिळत असतानाही सुविधा पुरवण्याबाबत का दुर्लक्ष केले जाते, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

शहरातील क्रीडा सुविधा
३१ : मैदाने
१६ : बॅडमिंटन हॉल
१२ : लॉन टेनिस कोर्ट

मैदान आणि भेडसावणाऱ्या समस्या
१. मदनलाल धिंग्रा मैदान : येथे गुडघाभर गवत वाढले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये आजार पसरण्याची भीती आहे.
२. अण्णासाहेब मगर स्टेडियम : महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने उचलून आणलेल्या टपऱ्या येथे साठवून ठेवल्या आहेत. ज्यामुळे मैदानाचा वापर कमी झाला आहे. अशा अवस्थेत खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती व स्पर्धेतील कामगिरीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
३. यासह प्राधिकरण परिसरातील संजय काळे मैदान आणि चिंचवड येथील कृष्णानगरचे सिमेंट ग्राउंड येथेही अशीच परिस्थिती असल्याचे दिसून आले.

खेळाडूंच्या अडचणी :
- मैदानावर विविध भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या खासगी क्लास चालकांची गर्दी
- हौशी खेळाडूंची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे सरावात अडथळा येतो
- शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांसाठी जागेची कमतरता
- शालेय खेळाडूंना स्पर्धेपूर्वी योग्य तयारी करता येत नाही.
- बऱ्याच वेळा काही पालकांचा हस्तक्षेप

महापालिकेची जबाबदारी :
- मैदानांची नियमित देखभाल व स्वच्छता
- अतिक्रमणमुक्ती व साठवलेली टपरींची तत्काळ हटवणूक
- शालेय खेळाडूंना सरावासाठी प्राधान्य
- मैदाने भाड्याने देण्याच्या धोरणाबाबत नियोजन
- खेळाडूंना अडथळामुक्त सरावाची सुविधा
- शहरात क्रीडा संस्कृती रुजवण्यास प्रोत्साहन

उदयोन्मुख खेळाडूंचे खच्चीकरण
‘‘पिंपरी-चिंचवड हे क्रीडा क्षेत्रात नावाजलेले शहर आहे. येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. मात्र, मैदानांच्या सद्यस्थितीमुळे त्यांची तयारी, सराव आणि कामगिरीत अडथळे येत आहेत. यातून त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. महापालिकेने तातडीने उपाययोजना करून खेळाडूंसाठी पुन्हा उपयुक्त व सुरक्षित मैदाने उपलब्ध करणे,’’ अपेक्षित असल्याचे पालक सांगत आहेत.

शहरातील मैदानांची पाहणी करण्यात येत आहे. पावसामुळे काही मैदाने बंद ठेवण्यात आली आहेत. पाऊस थांबल्यानंतर मैदानांची स्वच्छता करण्यात येईल. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे.
- पंकज पाटील, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.

निगडी-प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा स्टेडियम परिसरात गवत वाढले आहे. त्यामुळे खेळताना डासांच्या समस्येला सामोरे जावे लागते. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे. त्यामुळे मुलांना मैदानावर पाठवावे, की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सारंग जाधव, पालक, निगडी-प्राधिकरण

अतिक्रमणविरोधी कारवाईत जप्त केलेल्या टपऱ्या महापालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये ठेवल्या आहेत. त्यामुळे आम्हाला सराव करताना अडचण निर्माण होत आहे. या समस्या दूर करून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण कराव्यात.
- मनीष कदम, खेळाडू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government Formation Update: बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग ; JDU नेते अमित शहांच्या भेटीला दिल्लीत!

Pachod Crime : भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्याला पंचवीस लाखाची रोकड घेऊन जातांना चोरट्यांनी लुटले

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

SCROLL FOR NEXT