पिंपरी-चिंचवड

मस्तवाल पिस्तूल्यांना रोखण्याचे आव्हान

CD

पिंपरी, ता. २७ : बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतात. गेल्या काही वर्षांत कारवाईचे प्रमाण वाढले आहे, पण खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे यांसह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पिस्तुलाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान खडतर झाले आहे.
आतापर्यंतची आकडेवारी पाहता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१९ पासून बेकायदा पिस्तूल जप्तीची कारवाई वाढली आहे. त्याबद्दल गुन्हेगारांना अटकही करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पिस्तूल जप्त केल्या. तरीही अनेक गुन्ह्यांमध्ये पिस्तुलाचा वापर होत असल्याने या पिस्तूल येतात कुठून याचा सखोल तपास करून बेकायदा व्यवहारांना आळा घालणे पोलिसांसाठी क्रमप्राप्त बनले आहे.
गोळीबारात एकजण जखमी, पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले, असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यामुळे सामान्यांचा थरकाप उडतो. शहरात मागील काही दिवसांत घडलेल्या पिस्तूलामुळे एखाद्याचा जीव जाण्यासह काहीजण गंभीर जखमीही देखील झाले आहेत.
-------------------------------
बेकायदा पिस्तूल जप्तीची कारवाई
२०१९ ः ७०
२०२० ः ८९
२०२१ ः ९१
२०२२ ः ५८
२०२३ - १९६
२०२४ ः २१६
२०२५ ः ७९
(जुलै पर्यंत)
एकूण ७९९
---------------------
भरदिवसा गोळीबार
मागील आठवड्यात तर पिंपरीत गर्दीच्या ठिकाणी भरदिवसा तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली. अशा पिस्तूल येतात कुठून याचा सखोल तपास करून पिस्तूल पुरविणाऱ्याच्या मुळापर्यंत जाऊन कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली. आहे.
-----------------------
- सव्वा वर्षातील प्रमुख गुन्हे
- २४ एप्रिल २०२२४
तळेगाव-दाभाडे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून अल्पवयीन मुलासह तिघांनी केलेल्या गोळीबारात एक तरुण जखमी
-------------------------------------------
- १३ सप्टेंबर २०२४
काळेवाडीतील हॉटेलात सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार
--------------
- १७ सप्टेंबर २०२४
वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार
---------------
- १२ ऑक्टोबर २०२४
खेड तालुक्यातील महाळुंगे येथे गरबा कार्यक्रमातील भांडणात एकाच्या छातीत गोळी मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
--------------------------
- ३१ डिसेंबर २०२४
खेड तालुक्यातील निघोजे येथे तरुणाने पत्नीवर गोळी झाडण्याचा प्रयत्न, मात्र, ट्रिगर दाबला न गेल्याने ती बचावली
-----------------------
- २० जानेवारी २०२५
चाकण औद्योगिक परिसरातील वराळे येथे दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांकडून स्टील कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न
--------------------------------------
- १४ फेब्रुवारी २०२५
देहूरोडमधील गांधीनगर परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमातील भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा सराईत गुन्हेगाराने पिस्तुलातून गोळी झाडून खून
----------------------
- १९ जुलै २०२५
निगडीतील प्राधिकरणात वृद्धाच्या बंगल्यावर पिस्तुलाचा धाक



दाखवून दरोडा
-----------------------------
१ ऑगस्ट २०२५
- पिंपरी कॅम्पात गेलॉर्ड चौकाजवळ थंड पेय घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या चोरट्याने दुकानमालक तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न, प्रतिकार होताच चोरट्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT