पिंपरी-चिंचवड

पुढील आर्थिक वर्षासाठी कामे सूचवा

CD

पिंपरी, ता. १४ : महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांना विकासकामे सुचवता येणार आहेत. २०२६-२७ या अर्थसंकल्पात नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांना १५ ऑगस्ट २०२५ पासून त्यांच्या सूचना देता येणार आहेत.

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी महापालिकेला आठ प्रभागांतून दोन हजार २७९ नागरिकांच्या सूचना प्राप्त झाल्या. छाननीनंतर त्यांपैकी ७८६ सूचना स्वीकारल्या आणि नागरिकांनी सुचवलेल्या तब्बल ४९९ कामांना निधी दिला. नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी ९४.८६ कोटी रुपये राखीव निधी ठेवला. मात्र, महापालिकेने सामाजिक कामांना प्राधान्य देत १३८.९८ कोटी रुपयांचा निधी वाटप केला.

२०२५-२६ मध्ये ‘ड’ प्रभागाला सर्वाधिक लाभ
नागरिकांनी सुचविलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या १० टक्के निधीची तरतूद केली जाते. त्यानुसार सर्वात जास्त लाभ ‘ड’ प्रभागाला झाला. या प्रभागातील पुनावळे, ताथवडे, वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांनी सुचवलेली विविध कामे पूर्ण करण्यात आली. मुख्य रस्ते, सांडपाणी प्रकल्प आणि उद्यानांच्या कामांसाठी ४३.८८ कोटींचा निधी दिला.

‘ब’ प्रभागातील रावेत, किवळे येथील कामांसाठी २०.६० कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीत रस्त्यांच्या कामांपासून रावेतमधील नवीन महापालिका शाळेपर्यंतची कामे आहेत. शहरातील जवळपास सर्वच प्रभागांतून आलेल्या नागरिकांच्या सूचनांमध्ये रस्त्यांची कामे, पादचारी मार्ग, उद्यान सुधारणा, कचरा व्यवस्थापन अशा प्रमुख कामांचा समावेश होता. तसेच, सर्वच प्रभागांत सार्वजनिक सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे, थेरगावमध्ये शहरी रस्ता डिझाईन मानकांनुसार पादचारी मार्ग बांधणे आणि पिंपरी गावात रेल्वे उड्डाणपूल विकसित करणे अशा कामांचाही समावेश होता.
नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये निधीची तरतूद केली आहे. आता पुन्हा २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्यात येत आहेत. नागरिकांना १५ ऑगस्टपासून सूचना नोंदवता येणार आहेत.
------
असा नोंदवा अभिप्राय
- शहरातील कोणताही रहिवासी कामाची सूचना देऊ शकतो
- पालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सूचना नोंदवता येईल
- ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा प्रत्येक प्रभाग कार्यालयात असेल
- सुचवलेल्या योजनांसाठी मालमत्ता कराच्या १० टक्के निधी ठेवला जातो
- रस्ते, पादचारी मार्ग, उद्याने, सार्वजनिक सुविधा अशा कामांसाठी निधी वापरला जातो

अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग घेतल्याने अर्थसंकल्प सर्वसमावेशक होत असून यामुळे शहरातील गरजांनुसार नागरी सुविधांचा विकास होण्यास मदत होत आहे. २०२५-२६ अर्थसंकल्पामध्ये नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी निधीची तरतूद केली. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पासाठी पुन्हा एकदा नागरिकांना सहभाग नोंदवता येणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Dev on stray dog protection: भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी आता कपिल देवही मैदानात; अधिकाऱ्यांना केलं 'हे' आवाहन!

Operation Sindoor मधील शूरवीरांचा सन्मान! १६ BSF सैनिकांना शौर्य पुरस्कार, पाहा संपूर्ण यादी अन् 'या' योद्ध्यांचा शौर्यसंग्राम

Virat Kohli - Rohit Sharma यांचं वनडेतील करियरही संपलं म्हणणाऱ्यांना सुरेश रैनाची चपराक; म्हणाला, ते महत्वाचे आहेत कारण...

Imtiaz Jaleel mutton chicken party: स्वातंत्र्यदिनी जलील यांच्या घरी होणार मटण-चिकन पार्टी; आयुक्तांसह थेट मुख्यमंत्र्यांना निमंत्रण!

Latest Marathi News Updates: सिंहगडावरील ध्वजस्तंभाची वन विभागाकडून तातडीने दुरुस्ती

SCROLL FOR NEXT