पिंपरी, ता. १४ : भोसरी येथील प्रभाग आठमधील महिलांसाठी श्रावण महिन्यामध्ये श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शन यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका नम्रता योगेश लोंढे आणि राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश भगवान लोंढे यांच्या संकल्पनेतून यात्रेचे आयोजन करण्यात आले. त्याचा प्रभागातील दोन हजार ५४१ महिलांनी लाभ घेतला. आरामदायी ट्रॅव्हल्स बस, नाश्ता, चहा, जेवणाची मोफत व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली. बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. त्याच्या दर्शनाचा लाभ घेतलेल्या महिलांनी आयोजकांचे आभार मानले.