पिंपरी-चिंचवड

घरेलू कामगारांच्या कल्याणात अटींचा अडसर

CD

पिंपरी, ता. १६ : कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी इतरांच्या घरची पडेल ती कामे करणाऱ्या कामगार महिलांच्या कल्याणासाठी राज्य सरकारच्या घरेलू कामगार कल्याण मंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात. पण, याचा लाभ घेण्यासाठी किचकट अटी व शर्ती असल्यामुळे शहरातील लाखो घरेलू कामगार लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. यावर या कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात घरकाम करणाऱ्या महिला कामगारांची संख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ लाख ७ हजार ९४१ इतकी नोंदविण्यात आली आहे. मागील पंधरा वर्षांत पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत, मोशी, चऱ्होली भागांतील वाढत्या गृहनिर्माण क्षेत्रामुळे पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. याच्या तुलनेत घरकाम करणाऱ्या महिला कामगारांची संख्यादेखील दोन लाखांहून अधिक असण्याची शक्यता आहे. या महिलांना कामाच्या बदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांतून मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, मोबाइल रिचार्ज, वीज बिल, घरभाडे, किराणा, भाजीपाला आणि उरल्यासुरल्या पैशांतून दवाखाना या गरजा भागवाव्या लागतात.

पात्रता, कागदपत्रे जुळविताना कसरत
शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी किचकट अटी व शर्ती आहेत. त्यामुळे योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरणे या महिलांना कठीण जाते. त्यातच अशिक्षित कामगारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे कागदपत्रे गोळा करताना नाकीनऊ येतात. शहरातील बहुतांश कामगार महिला परप्रांतीय आहेत. त्यामुळे त्यांना राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे सहज उपलब्ध होत नाहीत. यामुळे हजारो घरेलू कामगार मूळ योजनांच्या लाभापासून वंचित आहेत.


कामाचे स्वरूप -
स्वच्छतेची कामे :
- झाडणकाम, फरशी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे
- स्वच्छतागृह आणि शौचालय स्वच्छ करणे

स्वयंपाक :
- पूर्ण स्वयंपाक तयार करणे
- काही घरांमध्ये फक्त चहा-नाश्ता, पोळ्या करणे
- भाज्या चिरणे, साहित्य तयार करून देणे

लहान मुलांची देखभाल :
- नवजात बाळांना सांभाळणे, त्यांना आंघोळ घालणे, दूध पाजणे
- शाळेत जाण्या-येण्यासाठी तयारी करून देणे

वृद्धांची देखभाल :
- औषधे वेळेवर देणे, अन्न-पाणी देणे
- आंघोळ घालणे किंवा मदत करणे
- डॉक्टरकडे घेऊन जाणे (कधी कधी)

कपडे इस्त्री व घड्या घालणे :
- धुतलेले कपडे वाळवणे, इस्त्री करणे
- कपडे घड्या घालून ठेवणे

विविध इतर कामे :
- किराणा माल आणून देणे, सोसायटीतील कचरा टाकणे
- पाळीव प्राण्यांची देखभाल, घराची राखण


योजनांचे प्राथमिक स्वरुप -
अपघात सहाय्य : अपघात झाल्यास लाभार्थ्याला तत्काळ आर्थिक सहाय्य.
शिक्षण सहाय्य : लाभार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत.
वैद्यकीय सहाय्य : लाभार्थी किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी वैद्यकीय खर्च.
प्रसूती लाभ : महिला कामगारांना प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य.
अंत्यविधी सहाय्य : लाभार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्चाची रक्कम.

कागदपत्रे मिळविताना येणाऱ्या अडचणी
- रेशन कार्ड, विज बिल स्वतःच्या नावे नसते.
- घरमालक प्रमाणपत्र देण्यास विरोध करतात.
- उत्पन्नाचा दाखला शहरातला मिळत नाही.
- नोंदणीच्या सहा महिन्यानंतर लाभ लागू होतो.
- दरवर्षी नूतनीकरण बंधनकारक आहे.
- नोंदणीकृत माहिती अद्ययावत ठेवावी लागते.

शहरात सुमारे ९०० घरेलू कामगार महिला सरकारी मदतीसाठी पात्र असूनही त्यांना लाभ दिला जात नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांनी एका कार्यक्रमात भांडी वाटप केली. निवडणुकीनंतर त्यांना विसर पडला. वैद्यकीय, आरोग्य, शैक्षणिक, प्रसूती, अंत्यविधी अर्थसहाय मिळत नाही.
- अपर्णा दराडे, अध्यक्षा, पुणे जिल्हा घर कामगार संघटना

घरेलू कामगारांच्या योजना कागदावरच असतात. तुटपुंज्या पैशांसाठी मिळेल ते काम करणाऱ्या कामगार महिलांना लाभाचे हस्तांतरण वेळेत करण्यात यावे. योजनांचे नियम व अटी शिथिल केल्यास सर्व घरेलू कामगारांना योजनेचे लाभ मिळतील.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ

घरेलू कामगार योजना निधी वाटप करण्याचा आदेश शासनाकडून मिळाला आहे. सध्या नोंदणीकृत कामगारांची माहिती अंतिम केली जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या महिनाअखेरीस लाभ हस्तांतरण केले जाईल. नोंदणीकृत प्रत्येक कामगाराला लाभ देण्यात येईल.
- शीतल कुलकर्णी, सहायक कामगार आयुक्त, पुणे असंघटित विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT