पिंपरी-चिंचवड

वेगवेगळ्या कारवायांत सात गुन्हेगारांना अटक

CD

पिंपरी, ता. १६ : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवायांत सात गुन्हेगारांना अटक केली. पोलिसांनी आठ पिस्तुलेही जप्त केली.
गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने इंदोरीतील कारवाईत राकेश येवले (वय ३३, रा. कान्हेवाडी तर्फे चाकण) याच्याकडून दोन पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ताथवडे येथे प्रसाद आठवले (वय २१, रा. जाधववस्ती, नांदेड फाटा, किरकटवाडी) याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानापाशी सांगवी पोलिसांनी आनंद ऊर्फ पेट्या कोळी (वय २८, रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. भोसरी पोलिसांनी शांतिनगर येथील कारवाईत जय राजेश चौटालिया (वय १९, रा. दिघी रस्ता, भोसरी) याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व एक काडतूस जप्त केले. देहूरोड पोलिसांनी विकासनगरमधील कारवाईत आदित्य घारू (रा. बापदेवनगर, देहूरोड) याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले.
गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने बाबा सैपन शेख (वय २७, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, पिंपळे गुरव) या अट्टल गुन्हेगारासह त्याचा साथीदार आशिष अनिल कांबळे (वय २५, रा काशीद नगर, पिंपळे गुरव) यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
बाबा शेख हा सराईत गुन्हेगार असून तो करोना काळात येरवडा कारागृह पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो कारागृहात हजर झाला नव्हता. त्याच्यावर १५, तर कांबळेवर दोन गुन्हे दाखल आहेत.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 12: नो हँडशेक ड्रामा! हरियाना स्टीलर्सने हास्तांदोलन टाळण्यावेळी काय झालं होतं? दबंग दिल्लीचा कर्णधार म्हणतोय...

MLA Rohit Pawar : सरकार झोपेत असेल तर... मग आम्ही गप्प बसणार नाही; शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही

Latest Marathi News Live Update: राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

Dasara Festival: आपट्याच्या झाडाचं नेमकं महत्त्व काय? पानं दसऱ्याला सोनं म्हणून का वाटतात?

Electricity Shock : विजेच्या शॉक लागुन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील चिंचखेडा (बुद्रुक) येथील घटना

SCROLL FOR NEXT