पिंपरी-चिंचवड

अमेरिकेसाठी टपाल पार्सल सेवा पुन्हा सुरू

CD

पिंपरी, ता. १७ : भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’मुळे खंडित झालेली टपाल विभागाची पार्सल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. अमेरिकेने शुल्क वाढविल्याने भारतातून पार्सल पाठविणे महागले होते. पण, त्यावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी फराळाचे पदार्थ पाठविणेही शक्य होणार आहे.
दिवाळी कालावधीत पुण्याहून पाठवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय पार्सलपैकी जवळपास ५० टक्के पॅकेजिंग फराळाचेच असते. साधारणपणे आठ ते १५ दिवसांत हे पार्सल पोहोचतात. लोकांना खासगी कुरिअर कंपन्यांच्या जास्त दरांना बळी न पडता, आपल्या प्रियजनांना सणासुदीचे पदार्थ पाठवता यावेत, यासाठीच आम्ही अमेरिकेला ही सेवा पुन्हा सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूर्वी अमेरिकेत कमी किमतीच्या आंतरराष्ट्रीय शिपमेंटवर कर सवलत होती. पण, तेथील सरकारने एक नवीन नियम आणला, ज्यामुळे ही सवलत रद्द झाली. त्यामुळे भारतीय टपाल विभागाने अमेरिकेत फराळ पाठवण्याची सेवा तात्पुरती थांबवली होती. ‘‘अमेरिकन सरकारच्या लावलेल्या करांमुळे आम्ही फराळाच्या पदार्थांचे पार्सल पाठवत नव्हतो. पण, आता आम्हाला प्रायोगिक तत्वावर ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा आदेश भारत सरकारकडून मिळाला आहे,’’ अशी माहिती जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांनी दिली.

अमेरिकेसाठी स्पीड पोस्ट पार्सलचे दर
पार्सलचे वजन आणि दर
पाच किलो- ५,५१० रुपये
दहा किलो - ९,०५० रुपये
२० किलो - १६,१३० रुपये
(शुल्क ‘जीएसटी’सह)

१० लाख ७६ हजारांचे बुकिंग
टपाल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘एक ते १७ ऑक्टोबरपर्यंत फराळाचे पदार्थ परदेशात पार्सल पाठविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले आहे. यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून दोन हजार ७५५ पार्सल बुक झाले. त्यातून प्रशासनाला दहा लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला Google वर जास्त सर्च केलं? रोहित, विराट Top 10 मध्येही नाही...

Marathi Breaking News LIVE: आठवडाभरात दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार न केल्यास पालिका निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात मतदार यादींची होळी करणार - संदेश देसाई

Sangli Crime : ट्रकमधून पाच लाखांचे शस्त्रक्रिया साहित्य गायब; पोलिसांच्या चतुर कारवाईत तीन महिलांची कबुली, मोठा गुन्हा उघड

Manchar News : मंचर बाजार समितीतर्फे प्रति क्विंटल ५,३५८ रुपये शासकीय हमी बाजारभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mumbai Local: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलकडून १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित, कारण काय?

SCROLL FOR NEXT