पिंपरी-चिंचवड

उपायुक्त पंकज पाटील, ममता शिंदे प्रथम

CD

पिंपरी, ता. १७ ः महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा उत्साहात झाल्या. पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत उपायुक्त पंकज पाटील, तर महिला गोळाफेकीत उपायुक्त ममता शिंदे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
बॅडमिंटनमध्ये पुरुष गटात कार्यकारी अभियंता हरविंदर सिंह बन्सल, तर महिला गटात मनीषा खेडकर विजेते ठरले. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची, पासिंग बॉल, तिरंदाजी आदी स्पर्धा झाल्या. महिला कर्मचाऱ्यांसाठी पाककला, रांगोळी आणि फॅन्सी ड्रेस अशा स्पर्धा झाल्या. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल आदी उपस्थित होते.

स्पर्धा आणि विजेते
संगीत खुर्ची (पुरुष) ः बबन झिंजुर्डे, माधव सोनवणे, प्रशांत जोशी.
पासिंग बॉल (महिला) ः उज्ज्वला करपे, संगीता वाळूंजकर, कल्याणी ढोबळे.
नेमबाजी (पुरुष) ः दत्ता सूर्यवंशी, योगेश गरड, यश डोळस. (महिला) ः उमा दरवेश, निवेदिता घार्गे, माधुरी चव्हाण.
बुद्धिबळ (पुरुष) ः विकास शिरोळे, अविनाश चव्हाण, योगेश वेदरकर. (महिला) ः रेश्मा जगताप, शीतल पवार, एस. एम. राऊत.
लांब उडी (पुरुष) ः पंकज पाटील, श्रीकांत झोरे, दीपक कन्हेरे. (महिला) ः रूपाली उभे, सुप्रिया सुरगुडे, मनीषा खेडकर.
गोळाफेक (महिला) ः ममता शिंदे, संगीता कराड, अश्विनी घुगे.
बॅडमिंटन (पुरुष) ः हरविंदर सिंग बन्सल, प्रशांत जगताप, विजयसिंह भोसले. (महिला) मनीषा खेडकर, तृप्ती सांडभोर, सुषमा तुरुकमारे.
क्रिकेट (पुरुष) ः पुणे महापालिका (प्रथम), पिंपरी चिंचवड महापालिका (द्वितीय). महिला ः पिंपरी चिंचवड महापालिकेचे दोन संघ (प्रथम व द्वितीय).
---

महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. खेळातून संघभावना, शिस्त आणि उत्साह वाढतो; हेच गुण नागरिकांच्या उत्तम सेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आरोग्य टिकण्यासाठी खेळत राहावे. त्यामुळे जनसेवेतील कार्य अधिक प्रभावी बनते. या उपक्रमांमधून महापालिका परिवारातील एकजूट, उत्साह आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना हीच महापालिकेची खरी ताकद आहे.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Bharti: पुणे शहर पोलिस दलात मेगा भरती! दोन हजार जागांसाठी दोन लाख अर्ज

Dimbha Dam Notice : डिंभा धरणातील आदिवासींना जलसंपदा विभागाची नोटीस; राष्ट्रवादीने दिला आंदोलनाचा इशारा!

Latest Marathi News Live Update : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेची घोषणा

T20 सामन्यात ड्रामा! पूरनने स्टंपिंगच केलं नाही, मग फलंदाजच स्वत:च रिटायर्ड आऊट; अखेर Mumbai Indians च्या टीमचा १ रनने पराभव

Viral Video: 'सोशल मीडिया'वर टास्क; गायीला खाऊ घातलं चिकन, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झोडपून काढला

SCROLL FOR NEXT