पिंपरी-चिंचवड

तलवारीचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

CD

पिंपरी : एका रिक्षाचालकाला तलवारीचा धाक दाखवून रोकड लुटली. ही घटना निगडी परिसरातील संग्रामनगर झोपडपट्टी भागात घडली. या प्रकरणी अनिकेत आनंदा जाधव (रा. संग्रामनगर झोपडपट्टी, चिकन चौक, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुशील गोरे, आदित्य उगले, गणेश धनुरे, रितेश तुपसौंदर्य, वेदांत वाटरकर, कार्तिक शिंदे, रोहन बोरे, कार्तिक गुजमल, अरमान देशमुख (सर्व रा. ओटा स्कीम, निगडी) यांच्यावर गुन्‍हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या रिक्षाजवळ उभे असताना आरोपी तेथे आले. आरोपी सुशील गोरे आणि आदित्य उगले यांनी तलवारीचा धाक दाखवत फिर्यादीकडील तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. इतर साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तलवारी हवेत फिरवत भाई असल्याचे सांगत दहशत निर्माण केली.

खोटे ऑनलाइन पेमेंट दाखवून सराफाची फसवणूक
पिंपरी : एका सराफ दुकानात एका महिलेने सोने खरेदीचे खोटे ऑनलाइन पेमेंट दाखवून सराफाची फसवणूक केली. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणी चिखलीतील जाधववाडी येथील सराफ व्यावसायिकाने चिखली पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्‍हा दाखल केला आहे. एक महिला फिर्यादी यांच्‍या दुकानात दागिने खरेदी करण्‍याच्‍या उद्‌देशाने आली. त्‍या महिलेने ७७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. त्यानंतर तिने मोबाइलद्वारे ऑनलाइन पेमेंट केल्याचे भासवले. त्यानंतर लगेचच आरोपी महिला दुकानातून निघून गेली.

शेअर मार्केटच्या नावाखाली २१ लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्‍ये गुंतवणुकीच्या नावाखाली २१ लाख २६ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. ही घटना खराळवाडी, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी राजेश नारायणदास मिराणी (रा. पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या लिंकवर क्लिक करताच एक अॅप डाऊनलोड झाले. त्यानंतर आरोपींनी विश्वास संपादन करून विविध व्यवहारांसाठी २१ लाख २६ हजार २०० रुपये मागवले. फिर्यादी यांनी वेगवेगळ्या खात्यांवर रक्कम पाठवल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

तरुणाकडून दोन पिस्तूल जप्त
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या गुन्‍हे शाखेच्‍या मालमत्‍ता विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई गहुंजे-मामुर्डी परिसरातील शितळामाता मंदिराजवळील मैदानात करण्‍यात आली. प्रज्वल रवींद्र मळेकर (वय २३, रा. साईनगर, मामुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख ३० हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल व तीन काडतुसे जप्त केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

Winter Tips: तुमचेही हिवाळ्यात केस खुप गळतात का? मग घरच्या घरी 'हे' सोपे उपाय

Horoscope Prediction : आठव्या घरात गुरु ग्रहाची छाया! कामधंदा, नातेसंबंध अन् मानसिक शांतीवर होईल गंभीर परिणाम, आजच करा हा सोपा उपाय

PM Narendra Modi Blog : "माझ्या सारखा गरीब माणूस पंतप्रधान झाला कारण.." मोदींनी सांगितली जुनी आठवण, हत्तीवरून संविधान...

IPS अधिकाऱ्याच्या मुलाने केलेली LLB करणाऱ्या मुलीची हत्या; तिच्या घरीच केला रेप, तरीही झालेली त्याची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT