पिंपरी-चिंचवड

मॉरिशस येथे जोपासलेली मराठी संस्कृती अभिमानास्पद! - डॉ. रवींद्र घांगुर्डे

CD

पिंपरी,ता. २६ : ‘‘महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असूनही मॉरिशस येथे जोपासलेली मराठी साहित्य, संगीत आणि संस्कृती अभिमानास्पद आहे,’’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी काढले.
नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने मॉरिशस नॅशनल टीव्हीवरील वरिष्ठ निर्माता तथा गायक अर्जुन पुतलाजी यांना मराठी संस्कृती संवर्धन पुरस्कार डॉ. घांगुर्डे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, मकरंद गोंधळी, कवयित्री कल्पना गवारी, कवी रवींद्र सोनवणे यांची उपस्थिती होती.
कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले म्हणाले, ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला असला, तरी मूळ महाराष्ट्राच्या असलेल्या; पण सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी मॉरिशस येथे गेलेल्या नागरिकांच्या पुढील पिढ्यांनी मराठी संस्कृती जपली आहे.’’
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पुतलाजी यांनी आधी मराठीतून आणि नंतर मॉरिशस येथील प्रचलित क्रियोल भाषेतून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यासमवेत आलेल्या मॉरिशस येथील भजनालंकार मंडळाच्या तीस जणांच्या समूहाने मराठी भक्तिगीतांचे सादरीकरण केले. सुभाष चव्हाण, रामगोपाल गोसावी, अक्षय लोणकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन, कलारंजन प्रतिष्ठानचे कार्यवाह आर. बी. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Politics: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलणार? आमदार पोहोचले दिल्लीत; काँग्रेस अध्यक्षांनी दिले 'हे' संकेत

Pune Metro News : पुणेकरांसाठी Good News! ; मोदी सरकारची पुणे मेट्रोच्या 'या' दोन महत्त्वाच्या मार्गिकांना मंजुरी

Panvel Karjat Railway: पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरचे काम कधी पूर्ण होणार? जाणून घ्या प्रकल्पाची सध्याची स्थिती...

IND vs SA: 'गौतम गंभीर हाय हाय...' भारताच्या पराभवानंतर प्रशिक्षकाच्या समोरच चाहत्यांची घोषणाबाजी; Video Viral

Latest Marathi News Live Update: महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर

SCROLL FOR NEXT