पिंपरी-चिंचवड

वर्धापन दिन लेख

CD

वर्धापन दिन लेख
---
स्वतंत्र पोलिस आयुक्तालयामुळे
सुरक्षिततेला बळ

पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, सुरुवातीला पुरेसे मनुष्यबळ, वाहन तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कामकाजात खूप अडचणी येत होत्या. मात्र, मागील दोन-तीन वर्षात आयुक्तालयाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले असून, पोलिस ठाण्याची निर्मिती झाली आहे. तसेच विविध पथके स्थापन झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्व घडामोडींवर बारीक नजर आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सदैव तत्पर आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राहण्यास मदत होत आहे.
- मंगेश पांडे

पु णे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलिस ठाणे मिळून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आले. टप्प्याटप्याने नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली. त्यामुळे पोलिस ठाण्यांची संख्या २३ वर पोहोचली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणण्यावर अधिक भर दिला आहे. आता पोलिस आयुक्तालयाने औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवडसह चाकण औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. खंडणी उकळणे, उद्योजकांना त्रास देणे, लूटमार, माथाडींचा प्रश्‍न असे प्रकार रोखण्यासाठी वेळोवेळी उद्योजकांसमवेत बैठकी घेऊन अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. आता औद्योगिक क्षेत्रात पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन आहे. त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.

डायल ११२; तत्पर मदत
कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत पीडित व्यक्तीला नेहमीच मदतीची गरज भासत असते. हे लक्षात घेऊन ११२ ही आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली (हेल्पलाइन) सुरू करण्यात आली. त्यावर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीला तत्काळ मदत पोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस तत्पर असल्याचे दिसून येत आहे. मदतीसाठी कॉल आल्यानंतरचा प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी झाला आहे. २०२२ मध्ये सरासरी कालावधी ९.४४ मिनिटांचा होता. २०२३ मध्ये हा कालावधी ८. ५६ मिनिटे राहिला. तो आता ६.१८ मिनिटांवर आला आहे. त्यामुळे नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. एखाद्या व्यक्तीने ११२ क्रमांकावर फोन करून मदत मागितल्यास नियंत्रण कक्षातून त्यास प्रथम प्रतिसाद दिला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा (लोकेशन) तपासून तो फोन तत्काळ संबंधित शहराच्या पोलिस नियंत्रण कक्षाला जोडला जातो. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील संगणकीय यंत्रणेवर त्याबाबत माहिती दिसून येते. त्यानंतर कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणाजवळ असलेल्या वाहनास संपर्क साधला जातो. वाहनांवरील कर्मचारी कॉल प्राप्त होताच त्याला तत्काळ मदत पोहोचवतात.

औद्योगिक पोलिस ठाणे
औद्योगिक क्षेत्रात सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी चाकण व महाळुंगे एमआयडीसी ठाण्यांचे विभाजन करून दोन स्वतंत्र पोलिस ठाणे आणि औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र परिमंडळ निर्माण करण्याच्या हालचाली पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून सुरू आहेत.

हक्काची इमारत
पोलिस आयुक्तालयासाठी हक्काची इमारत नसल्याने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर इमारतीमध्ये कामकाज सुरू झाले. त्यानंतर प्रेमलोक पार्कमधील महापालिका शाळेची इमारत भाडेतत्त्वावर घेतली. सद्यःस्थितीत तेथूनच आयुक्तालयाचे कामकाज सुरू आहे. मात्र, ती जागाही अपुरी पडत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयासह विविध शाखांची कार्यालयेही इतरत्र सुरू आहेत. यामुळे कामकाज करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व सुविधांयुक्त अशा आयुक्तालयाच्या इमारतीची आवश्यकता आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तालयाला स्वमालकीची जागा मिळावी, यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू होता. अखेर चिखली जाधववाडी येथील जागा शासनाकडून आयुक्तालयासाठी ताब्यात मिळाली. शासनाच्या सावर्जनिक बांधकाम विभागामार्फत या इमारतीचे बांधकाम केले
जाणार आहे. येथे पोलिस आयुक्तालयाची भव्य सहा मजली अंडाकृती इमारत उभी राहत आहे. तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हक्काच्या इमारतीचे स्वप्न पूर्ण होत आहे. या इमारतीचे भूमिपूजन फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तीन वर्षात बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन असून, देशातील अत्याधुनिक इमारत ठरणार आहे.

आधुनिकतेमुळे तपासाला गती
पिंपरी चिंचवड पोलिस दलात तपासासाठी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन अशी आधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्याने तपासाला वेग आला आहे. श्वान पथक नव्याने स्थापन झाले असून, त्यासाठी अधिकारी व नऊ अंमलदार यांचीही पदे निर्माण झाली आहेत. यासह नव्याने सुमारे १०१ चारचाकी, १० बस, १ ट्रक, १ टँकर, तीन टेम्पो ट्रॅव्हलर व ७९ दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. मागील काही दिवसांत नव्याने परिमंडळ तीन, नवीन सायबर पोलिस ठाणे, बॉम्ब शोधक व नाशक पथक व सोशल मीडिया लॅब कार्यान्वित झाली आहे.

उत्कृष्ट ‘सायबर’
सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे स्थापन झाल्यानंतर सायबर गुन्ह्यांच्या तपासाला अधिक वेग आला आहे. तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासह व दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य नियोजन केले जात असल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अनेक सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या वर्षभरात साठपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली असून, यातील आरोपींचा माग काढला आहे. बऱ्याच आरोपींना राज्याबाहेरून ताब्यात घेतले आहे. या वर्षभरात जवळपास २१२ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची ही कामगिरी राज्य पोलिस दलात सर्वोत्कृष्ट आहे.

गुन्हेगारांच्या मुसक्या
शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांना आवर घालण्यासाठी गुंडाविरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाने गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव रोखण्यासाठी या टोळ्यांवर कडक कारवाई करण्यासह त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आतापर्यंत पन्नासपेक्षा अधिक मकोका अंतर्गत आरोपी जेरबंद केले असून, शंभरहून अधिक पिस्तूल व कोयते जप्त केले आहेत. यासह सुमारे दोनशे फरारी आरोपींना जेरबंद केले आहे. त्यामुळे दहशत माजविल्याच्या प्रकरणांना काही प्रमाणात आळा बसला आहे.

बाल गुन्हेगारांना ‘दिशा’
गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची शक्यता असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष बाल पथकामार्फत ‘दिशा’ उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत मुलांना योग्य मार्गदर्शन, शिक्षण, समुपदेशन, क्रीडा तसेच उद्योग, व्यवसाय प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे अनेक मुले चांगल्या मार्गाला लागली आहे. मुलांमध्ये संघ भावना निर्माण होण्यासाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. यातील विजेत्या संघाना गौरविण्यात आले.

दृष्टिक्षेपात नवीन इमारती
- पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचे चिखली जाधववाडी प्राधिकरणात काम सुरू
- पिंपरी पोलिस ठाणे व निवासस्थानांचे बांधकाम नव्याने करण्याची प्रक्रिया सुरू
- महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यासाठी इमारत उभारण्याची प्रक्रिया सुरू
- बाहेरून बंदोबस्तासाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासासाठी इमारत उभारणीचे नियोजन
- वरिष्ठ अधिकारी निवासस्थान व परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त यांच्या कार्यालयासाठी वाकड येथे पंधरा एकर जागा प्राप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

SCROLL FOR NEXT