पिंपरी-चिंचवड

‘सकाळ’ वाचकांचा आज चिंचवडमध्ये स्नेहमेळावा

CD

पिंपरी, ता. २८ : वाचकांच्या आवडीचे दैनिक ‘सकाळ’ पिंपरी चिंचवड कार्यालय दिमाखाने ३४व्या वर्षात पदार्पण करीत आहे. तीन दशकांचा स्नेह, ओढ नावीन्याची आणि घराघरांत, मनामनांत आतुरता अशी ‘सकाळ’ची ओळख राहिली आहे. हा स्नेह आणखी वृद्धिंगत होण्यासाठी ‘सकाळ’ने ३३व्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. २९) स्नेहमेळावा आयोजित केला आहे. त्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतकांचा स्नेहमेळावा शनिवारी (ता. २९) सायंकाळी ५.३० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह प्रांगणात साजरा होणार आहे. त्यावेळी वाचकांच्या मांदियाळीत सहभागी होण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, आपण सुद्धा नक्की यावे, हे आग्रहाचे निमंत्रण ‘सकाळ’ परिवार देत आहे. कारण, ‘सकाळ’सोबतचे आपले विश्वासाचे नातं आणि तीन दशकांचा आपला स्नेह अधिक वृद्धिंगत करायचा आहे. लाखो वाचकांची ‘सकाळ’ ज्याच्या वाचनामुळे खऱ्या अर्थाने उल्हासित होते, तो म्हणजे आपला सर्वांचा ‘सकाळ’ आहे. म्हणूनच आपल्याशी संवाद साधायला, त्यासाठी भेटूयात शनिवारी सायंकाळी प्रेक्षागृहाच्या प्रांगणात. पण, पुष्पगुच्छ आणू नये, ही आग्रहाची नम्र विनंती.

काय? कुठे? कधी? केव्हा?
काय? : सकाळ, पिंपरी कार्यालय ३३ वा वर्धापनदिन
कुठे? : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह प्रांगण, चिंचवड
कधी? : शनिवार, ता. २९ नोव्हेंबर २०२५
केव्हा? : सायंकाळी ५.३० ते ८.३० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

Kudal Zilla Parishad Election Result : कुडाळवर भगवा फडकला! भाजपच्या जयश्रीताईंचा 6716 मतांनी ऐतिहासिक विजय; पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतून काँग्रेस हद्दपार

BJP win ZP, Panchayat Samiti Elections : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपच अव्वल!, निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहसिन नक्वीची नवी मागणी! India vs Pakistan मॅच हवी असेल तर तिरंगी मालिका खेळवा; ज्यामध्ये भारत, पाकिस्तान अन्...

SCROLL FOR NEXT