पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

पादचारी मार्गावर अंधश्रद्धेला खतपाणी
पादचारी मार्ग चालण्यासाठी आहे की, अंधश्रद्धा पसरविण्यासाठी तेच समजत नाही. रहाटणी येथील पदपथावर लिंबू कापून फेकण्यात आले आहेत. पदपथाचा वापर अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केला जात आहे. या लोकांवर योग्य ती कारवाई करणे आवश्‍यक आहे. तसेच अशा कृत्यांना वेळेवर आवर घातला पाहिजे.
-अश्विनी पाटील, रहाटणी
NE25V73514

कामातील विलंबामुळे नागरिकांचा संताप
पिंपरी येथील जय महाराष्ट्र महाविद्यालय समोरील कै. धोंडिबा जाधव उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर स्थापत्य विभागाचे काम मागील कित्येक महिन्यांपासून सुरू होत आहे. ठेकेदाराने त्या ठिकाणी सिंमेटचे गट्टू रचून ठेवले आहेत. लवकरच काम सुरू होईल या आशेवर नागरिक गप्प होते, परंतु काम सुरू होत नाही हे नागरिकांच्या लक्षात आले असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क केला परंतु कोणीही प्रतिक्रिया मिळाली नाही. प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन त्वरित काम सुरू करावे.
-एक वाचक, नवी सांगवी
PNE25V73513

राडारोड्याची उघडी वाहतूक; नियमांना तिलांजली
प्राधिकरण रावेत सेक्टर ३२ अ येथे काही ठिकाणी बांधकाम प्रोजेक्ट चालू आहेत. प्रदूषण महामंडळ आणि महापालिका यांच्या नियमानुसार जनतेला तसेच रस्त्यावरील वाहनचालकांना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून बांधकाम साहित्य तसेच राडारोडा डंपर मधून नेताना कापडाने झाकून नेण्याचा नियम केला आहे. तरीदेखील काही डंपर चालक नियम डावलून बांधकाम राडारोडयाची उघडपणे वाहतूक करत आहेत. चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना देखील वाहतुकीविषयी केलेल्या नियमांचे उल्लंघन करून वाहतूक सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना संबंधित बांधकाम मालकांनी तसेच ठेकेदारांनी बांधकाम साइटवरील राडारोडा डंपर मधून नेताना हिरव्या कापडाने बंद करूनच नेण्याची सूचना द्यावी. तसेच वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे. -विलास खरे, रावेत
PNE25V73516


धोकादायक चेंबरकडे पालिकेचे दुर्लक्ष
आकुर्डी ते थरमॅक्स चौक रस्त्यावरील चेंबर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. वाहनचालकांनी चेंबर चुकविण्याचा प्रयत्न केला तर लेन बदलावी लागते आणि अपघाताला धोका निर्माण होतो. महापालिकेला तक्रार दिली असता पालिकेचे अधिकारी दुरुस्तीची जबाबदारी टाळून तक्रारदारांना अवलोकन करण्यास सुचवतात.
- बी. एस. पाटील संभाजीनगर
PNE25V73512

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT