पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

गुन्हे वृत्त
-------------
टेंपोच्या दरवाजाला धडकून
खाली पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी चुकीच्या पद्धतीने उघडलेल्या टेंपोच्या दरवाजाला धडकल्याने खाली पडलेल्या दुचाकीचालक तरुणाचा मागून येणाऱ्या ट्रकखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २) सायंकाळी सहाच्या सुमारास निगडी येथे त्रिवेणीनगर चौकात घडली. जैद तांबोळी (वय १९, रा. मिलिंदनगर, निगडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. टेंपोचालक नीलेश ग्यानुजी प्रधान (वय ३२, रा. राजनगर, ओटास्कीम, निगडी) आणि ट्रकचालक बाळासाहेब शंकरराव घोडके (वय ४५, रा. देवभूमी चौक, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वाहन चालकांची नावे आहेत. जलाल सलीम तांबोळी (वय ४२, रा. मिलिंदनगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा पुतण्या जैद हा गॅरेजमध्ये काम करतो. मंगळवारी सायंकाळी दुचाकीवरून चहा आणण्यासाठी तो चालला होता. मिलिंदनगर येथील सोमेश्वर मंदिरासमोर आला असता टेंपोचालक आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पोचा दरवाजा अचानक उघडला. याचवेळी जैदची दुचाकी दरवाजावर आदळून जैद खाली रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्याला चिरडले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जैद याचा मृत्यू झाला. फौजदार सातपुते तपास करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेत दुचाकीचालक महिला जखमी
पिंपरी ः विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव रिक्षाने स्कुटीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी भोसरी चौकात स्पाइन रोड येथे घडली. भोसरीतील पांजरपोळ येथील २७ वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला या दुचाकीवरून घरी चालल्या होत्या. स्पाइन रोडवरील सरदार चौकात रेड सिग्नल लागल्याने त्या थांबल्या. त्याचवेळी चुकीच्या दिशेने भरधाव आलेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादीच्या हाताला दुखापत झाली. पोलिस हवालदार माने तपास करीत आहेत.

कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्‍हा
पिंपरी धारदार कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणावर गुन्‍हा दाखल केला आहे. बुधवारी दुपारी अडीचच्‍या सुमारास महादेव मंदिराच्‍या शेजारी पवना नदीकाठी, बोपखेल येथे ही कारवाई केली. अथर्व गणेश काशीद (वय १८, रा. विठ्ठल मंदिर शेजारी, बोपखेल) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार नितीन सुरेश संकुनहट्टे यांनी बुधवारी याबाबत दापोडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीचच्‍या सुमारास आरोपी अथर्वने बोपखेल नदीकाठ परिसरात शंभर रुपयांचा लोखंडी कोयता विनापरवाना बाळगल्‍याचे आढळून आले. मनाई आदेश असतानाही शस्त्र बाळगल्याने आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला. दापोडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

कोणाला टबमध्ये बुडवून मारलं, तर कोणाला हौदात, सायको आंटीची चार मर्डरवाली खतरनाक काहानी!

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

SCROLL FOR NEXT