पिंपरी-चिंचवड

खासगी बसबाबत आरटीओ गंभीर आहे का ?

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ६ ः हिंजवडीमध्ये एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा जीव गेल्याच्या दुर्घटनेला एक आठवडा उलटेल तेव्हा प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) खासगी बसबाबत कारवाई करण्याची चिन्हे आहेत. मुळात खासगी बस वाहतूकदार संघटनेची बैठक घेण्यासाठी आरटीओला तीन दिवसांनी मुहूर्त मिळाला. यावरून आरटीओच्या कामगार आणि प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत खरोखरच गंभीर आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
ही दुर्घटना एक डिसेंबरला घडली. त्यानंतर तीन दिवस उलटले तेव्हा गुरुवारी (ता. ४) बैठक घेण्यात आली. त्यानंतर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. येत्या सोमवारपासून (ता. ८) कारवाईसाठी मोहीम सुरू होण्याची अपेक्षा आहे.
शहरात खासगी बस चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. मोठ्या बसशिवाय मिनी बसमधूनही कर्मचारी-कामगारांची वाहतूक केली जाते. अनेक चालक बस रस्त्याच्या मध्येच उभी करतात. अनेक चालक बस बेदरकारपणे चालवतात. त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघातही होतात. काही बस चालकांनी मद्यपान करून बस चालविल्याचे उघड झाले आहे. हिंजवडीत बस पदपथावर चढविलेल्या चालकाने मद्यपान केल्याचे उघड झाले होते. अनेक चालक मोबाईलवर रिल्स किंवा चित्रपट पाहात बस चालवतात. जाब विचारल्यावर ते दादागिरी करतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे. याकडे वाहतूक पोलिस आणि आरटीओ ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
याबाबत ‘सकाळ’ने २६ सप्टेंबर रोजी ‘कामगार वाहतुकीला असुरक्षेची धग’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतरही वाहतूक विभाग आणि आरटीओने दुर्लक्ष कायम ठेवले. हिंजवडीतील दुर्घटनेनंतर आरटीओला जाग आली. आरटीओच्या वायूवेग पथकामार्फत खासगी बसची तपासणी मोहीम सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या सोमवारपासून हिंजवडी आणि चाकण परिसरात खासगी बसची तपासणी केली जाईल. चालकाची ब्रेथ ॲनलायझरद्वारे तपासणी होईल. कागदपत्रे आणि मोटर वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
---------

कारवाईआधीच सतर्क केले
आरटीओने खासगी बस वाहतूकदार संघटनेची कारवाईपूर्वीच बैठक घेतली. वास्तविक आरटीओने अचानक तपासणी करून कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र बैठकीत संघटनेच्या प्रतिनिधींना कारवाईबाबत आधीच माहिती देऊन त्यांना एकप्रकारे सतर्क करण्यात आले.
---
आरटीओमार्फत सर्वच वाहनांची तपासणी केली जाते. सोमवार पासून हिंजवडी, चाकण आदी परिसरात वाहनांची तपासणी मोहीम सुरु केली जाणार असून दोषी वाहन चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
------
दृष्टिक्षेपात
खासगी बसचे पिकअप पॉइंट ः भोसरी, मोशी, चिखली, निगडी, तळवडे, भूमकर चौक, डांगे चौक
मॅक्सी कॅब ः १,३२७
खासगी बस ः १५,४८७
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Indigo Flight Chaos : विमानाच्या गोंधळामुळे आमदार रस्त्यावर; नागपूर अधिवेशनासाठी निघाले मोटारीने!

Karnataka CM Siddaramaiah : ‘’सरकार अविश्वास प्रस्तावाला तोंड देण्यास तयार'’ ; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं मोठं विधान!

Hapus Dispute: वलसाड हापूस नावाने जीआय टॅगसाठी अर्ज, मालकी हक्कही सांगितला अन्...; कोकणातील हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

चार हजार मीटर खोल समुद्रात १६० दिवस राहिले वैज्ञानिक; प्रशांत महासागरात जे दिसलं त्याने सगळेच हादरुन गेले

SCROLL FOR NEXT