पिंपरी-चिंचवड

शिधापत्रिकेवरील ज्वारीचे वाटप जानेवारीपासून बंद

CD

पिंपरी, ता. ९ : शहरातील अन्नधान्य वितरण व्यवस्थेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. शिधापत्रिकेवर मिळणारे ज्वारीचे वाटप येत्या जानेवारीपासून थांबणार असल्याची माहिती चिंचवड परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून विविध स्‍वस्‍त धान्‍य दुकानांतून ज्वारीचे वाटप करण्यात येत होते. नागरिकांना गहू व तांदळासोबत पर्यायी धान्य म्हणून ज्वारी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम होता.
या वाटप काळात अनेक नागरिकांनी मिळणाऱ्या ज्वारीच्या गुणवत्तेबाबत तक्रारी केल्या. काही ठिकाणी धान्य नीट स्वच्छ नसे, तर काहींनी ‘ज्वारी खाण्यायोग्य नाही’ अशी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे काही ग्राहकांनी या वाटपाचा फायदा झाल्याचे सांगत ज्वारीचे वितरण पुढेही सुरू ठेवावे, अशी मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पुढील महिन्यांसाठी ज्वारीचा कोटा उपलब्धतेबाबत कोणताही आदेश किंवा सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्याचे ज्वारी वितरण फक्त दोन महिन्यापुरतेच मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोटा न मिळाल्याने जानेवारीपासून ज्वारी देणे बंद होणार असून, नियमित शिधावाटप केवळ गहू, तांदूळ आणि इतर ठरलेल्या धान्यापुरतेच राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमध्ये जाहिरातबाजी! बाबा बंगालीनंतर भोजपुरी चित्रपटांच्या ऑडिशनचे फलक; नियमांना हरताळ

KVS Recruitment 2026: शिक्षण क्षेत्रात नोकरीची संधी! KVS मध्ये 987 स्पेशल एजुकेटर मेगा भरती लवकरच; जाणून घ्या वयोमर्यादा आणि निवड प्रक्रिया

KDMC Mayor: राजकीय नाट्यावरचा पडदा अखेर उघडला! एकनाथ शिंदेंचा 'हा' शिलेदार होणार महापौर; केडीएमसी महापौर–उपमहापौर पदाचे चित्र स्पष्ट

झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? "असं नका करू" चाहत्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी नेते सुनील तटकरेंचा उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT