पिंपरी-चिंचवड

पवनमावळात माती परीक्षणातून जनजागृती मोहीम सुरू

CD

सोमाटणे, ता.११ ः पवनमावळातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी साळुंब्रेच्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षणातून जनजागृतीची मोहीम सुरु केली आहे.
सेंद्रिय पद्धतीने शेती करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घ्यावे, पीक रोगमुक्त यावे यासाठीच्या उपाययोजना शेतकऱ्यांना समजाव्यात तसेच आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व आदींचा प्रसार करण्यासाठी साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मृदादिन निमित्त जनजागृती मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम संस्थेचे कार्यवाह व्यंकटराव भताने यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प प्रमुख देठे, गणेश भताने यांच्या सहकार्याने झाली. नववीच्या विद्यार्थ्यांनी साळुंब्रे येथील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रात्यक्षिकांसह माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले. या उपक्रमास समीर वाघोले यांच्यासह सर्व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. कृषी विभागाच्या मदतीने मातीच्या प्रकारानुसार पिकाची निवड कशी करावी, कोणत्या पिकास कोणत्या अन्नद्रव्याची अधिक गरज असते त्यानुसार हे घटक सेंद्रिय खतातून कसे मिळतात, पिकांच्या प्रकारानुसार त्यास आवश्यक असलेले खत, पिकांची मशागत, रोग नियंत्रणाचे योग्य तंत्र, पिकातील घटकांचे मानवी आरोग्यासाठी महत्त्व या विषयीची माहिती शेतकऱ्यांना सांगितली.
PNE25V75385

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Malad News : मालाड क्रीक येथील मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Manchar Protest : भावडी गावकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध; झाडांची तोड थांबवण्याची मागणी

त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

SCROLL FOR NEXT