पिंपरी-चिंचवड

‘ईएसआय’ रुग्णालयाला सुविधांचे ‘टॉनिक’

CD

पिंपरी, ता. १२ : कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या मोहननगर येथील राज्य कर्मचारी विमा (ईएसआय) रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि दंतचिकित्सा विभागाचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे हे उपचार केंद्र आणखी सक्षम होणार आहे. याचा फायदा रुग्णालय कार्यक्षेत्रातील कामगारांना होणार आहेच; शिवाय सुरक्षित व दर्जेदार उपचार मिळणार आहेत.

या रुग्णालयात ‘ईएसआय’ कार्डधारकांना मोफत उपचार मिळतात. मात्र, अत्याधुनिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक कामगारांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी इतर रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. आता राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाच्या आधुनिकिकरणाला गती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून, पुढील टप्प्यात शस्त्रक्रिया आणि दंतचिकित्सा विभागातही अत्याधुनिक उपकरणे कार्यान्वित केली जाणार आहेत.
या रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात हाय-डेफिनिशन लेप्रोस्कोपी युनिट्स, आधुनिक ऑटोक्लेव्ह, स्कोप्ससह अधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे आणि नव्या ॲनेस्थेशिया मशीन उपलब्ध केली जाणार आहे. ऑपरेशन थिएटरचे मॉड्युलर स्वरूप, लॅमिनर एअरफ्लो, उच्च दर्जाचे एचव्हीएसी व्यवस्थापन आणि जंतूमुक्त वातावरणासाठी अत्याधुनिक फिल्टर प्रणाली बसवली जाणार आहे. तसेच, प्री-ऑप आणि पोस्ट-ऑप विभागांत मॉनिटरिंग सिस्टिम, आरामदायी बेड, क्रिटिकल केअरसाठी आवश्यक उपकरणे आणि नर्स स्टेशनची सुधारणा केली जाणार आहे.

औषधांचा साठा, प्रशिक्षित कर्मचारी
शस्त्रक्रिया विभागात इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड् स, डिजिटल शस्त्रक्रिया वेळापत्रक आणि शस्त्रक्रिया विभागातील रिअल-टाइम डेटा मॉनिटरिंगमुळे उपचार प्रक्रिया जलद आणि अचूक होणार आहे. स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणासाठी विभागात मानक प्रोटोकॉल लागू केले जाणार आहेत. हातांच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणा बसवल्या जाणार आहेत. नष्ट करता येण्याजोग्या अर्थात ‘डिस्पोजेबल’ साहित्याचा अधिक वापर केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ शस्त्रक्रिया करता यावी, यासाठी आवश्यक उपकरणे, औषधांचा साठा आणि विशेष प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध केले जाणार आहेत.


दंततज्ज्ञांसह आपत्कालीन सुविधांवर भर

ईएसआय रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी आधुनिक दंत उपकरणांची उभारणी, रुग्णांना अनुकूल दंत खुर्च्या, डिजिटल एक्स-रे (आरव्हीजी), इन्ट्रा-ओरल कॅमेरा, अल्ट्रासोनिक स्केलर आणि रूट कॅनल युनिटची व्यवस्था केली जाणार आहे. अचूक उपचारांसाठी डिजिटल निदान प्रणाली आणि सॉफ्टवेअरवर आधारित उपचार नियोजन केले जाणार आहे. संसर्ग नियंत्रणासाठी ‘क्लास बी ऑटोक्लेव्ह’, डिस्पोजेबल साहित्य आणि कठोर हायजिनिक प्रोटोकॉल आवश्यक आहेत. तसेच, प्रशिक्षित दंततज्ज्ञ, सहाय्यक कर्मचारी, डिजिटल रेकॉर्ड व्यवस्थापन आणि बेसिक लाईफ सपोर्टसह आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शस्त्रक्रिया आणि दंतचिकित्सा विभागात आधुनिक पद्धतीने सुधारणा करण्यात येत आहेत. दोन्ही विभागांत अत्याधुनिक यंत्रणा बसवली जात असून, हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर रुग्णांना अधिक प्रगत आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून दिले जातील.
- वर्षा सुपे, चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर

या सुविधांवर भर
- अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे
- आरामदायी बेड्स
- प्री-ऑप व पोस्ट-ऑप केअर सुविधा
- डिजिटल प्रणाली
- स्वच्छता व संसर्ग नियंत्रण यंत्रणा
- आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था
- वैद्यकीय तज्ज्ञ, प्रशिक्षित कर्मचारी

PNE25V75736

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

SCROLL FOR NEXT