पिंपरी-चिंचवड

अमली पदार्थांची तस्करी पोलिसांवरही ‘भारी’

CD

पिंपरी, ता. १२ : पिंपरी चिंचवड पोलिसांनी गेल्या ११ महिन्यांत सुमारे साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यात मेफेड्रॉन (एमडी), गांजा, चरस, अफू, अफीम अशा पदार्थांचा समावेश आहे. एकीकडे अशी कारवाई वारंवार आणि ठिकठिकाणी होत असली, तरी शहरात अमली पदार्थांचा पुरवठा सुरूच आहे. तस्करांची ही साखळी मोठी असल्याचे पोलिस तपासणीतून समोर येते आहे. त्यामुळे हे ‘रॅकेट’ उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शहरात गांजासह इतरही अमली पदार्थांची होणारी विक्री व वाहतूक रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून पोलिसांनी मोहीम तीव्र केल्याचे सांगितले जाते आहे. काही सापळे रचून आरोपींना जेरबंदही करण्यात आले. प्रामुख्याने गेल्या ११ महिन्यांत १६९ प्रकरणांत गुन्हे दाखल करून २०५ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन कोटी ६६ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई होत असली, तरी अशा पदार्थांचे तस्कर शहर-उपनगरांत सक्रीय आहेत. एखाद्याला पकडले, तरी दुसरा सक्रीय होतो. या टोळीचे काम अतिशय छुप्या पद्धतीने आणि शांततेत सुरू असते. त्यामुळे हे अमली पदार्थ कोठून आणले जातात, कोणाला द्यायचे असतात आणि कोणापर्यंत पोहोचवायचे असतात, याची माहिती सहजतेने समोर येत नाही. त्यामुळे कारवाई होत असतानाही शहरात अमली पदार्थांचा पुरवठा सुरूच आहे. हे पाहता, एखाद्या प्रकरणात आरोपींला पकडल्यानंतर त्यांना हा माल पुरविणाऱ्यापर्यंत पोहोचून ‘मोड्युल’ नष्ट करणे आवश्यक बनले आहे.

परराज्यांत ‘नेटवर्क’
अटक केलेल्या छोट्या-मोठ्या पुरवठादारांकडून पोलिसांना मिळणाऱ्या माहितीनुसार तस्करीचा विस्तार उघडकीस येत आहे. यातील काही ‘रॅकेट’ परराज्यांतून चालवले जाते. त्यातच ऑनलाइन पेमेंट आणि ‘क्रिप्टो’ व्यवहारामुळे या तस्करीतील आर्थिक साखळी गुंतागुंतीची झाली आहे. लहान पुरवठादारांवर कारवाई करून केवळ वरवरचा स्तर नष्ट होतो; पण संपूर्ण ‘रॅकेट’ नष्ट करायचे असेल, तर मूळ सूत्रधारांपर्यंत पोहोचून त्यांची आर्थिक मुळे छाटणे आवश्यक आहे.


*जनजागृती आणि कारवाई
- अमली पदार्थविरोधी मोहीम
- शाळा-महाविद्यालयांत व्यसनमुक्ती व्याख्याने
- फलकांद्वारे रस्त्यावर जनजागृती मोहीम
- सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश

वर्षभरात तीन वेळा साठा नष्ट
विविध कारवाईत पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली. तिच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रांजणगाव एमआयडीसी येथे एका कंपनीच्या भट्टीत अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. ही कारवाई या वर्षभरात तीन वेळा करण्यात आली.

*अमली पदार्थ जप्तीची कारवाई
दाखल गुन्हे अटक आरोपी जप्त मुद्देमाल किंमत

१६९ २०५ गांजा - ६२८ किलो १७७ ग्रॅम ३ कोटी १४ लाख ५७ हजार
मेफेड्रॉन - ४६९ ग्रॅम ४४ लाख २४ हजार
अफू - ५०७ ग्रॅम २१ हजार ६०२
अफिम - १६ किलो ६७६ ग्रॅम ७ लाख ८८ हजार

चरस - १४६ ग्रॅम १४ हजार

एकूण ३ कोटी ६६ लाख ४६ हजार ४२७ रुपये
(मोहीम कालावधी : १ जानेवारी ते २६ नोव्हेंबर)

अमली पदार्थ विरोधी कारवाईची मोहीम सुरू आहे. मागील वर्षभरात २०५ आरोपींना अटक केलेली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. अमली पदार्थ तस्करीचे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करून त्याच्या मुळाशी जाण्यासाठीही नियोजन केले जात आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयामध्ये ऐतिहासिक वस्तूंची माहिती देणारं प्रदर्शन

Pune Traffic Update : शिवणे- नांदेड पूल रस्ता शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम!

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Solapur Crime : ‘हलगी का वाजवत जातोस?’ म्हणत हल्ला; बार्शीच्या वांगरवाडीत चार जणांविरोधात 'ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT