पिंपरी-चिंचवड

परीक्षा शुल्क वाढूनही विद्यार्थी वाढले

CD

पिंपरी, ता. १७ ः इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात शासनाने दुपटीहून जास्त वाढ केली आहे. त्यानंतरही परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तीन वर्षातील उपलब्ध आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (पुणे) दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृती परीक्षा घेते. महापालिका, खासगी, अनुदानित, विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील विद्यार्थी ही परीक्षा देतात. मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांतून परीक्षा होते. तीन वर्षांपूर्वी शासनाने दोन्ही शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याऐवजी परीक्षा आणि प्रवेश शुल्कात एकूण अडीचपट वाढ केली. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेकडे कल नसणारे विद्यार्थी यापुढे परीक्षा देतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसण्यास प्राधान्य दिले आहे.
बिगरमागास; तसेच मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क २० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले. तर बिगरमागास विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ६० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले. यापूर्वी, मागास आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क आकारण्यात येत होते. आता ७५ रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षांसाठी बिगरमागास विद्यार्थ्यांना एकूण २०० रुपये, तर मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

खर्च वाढल्याने शुल्कात वाढ
शालेय शिक्षण विभागाने २०१० नंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत फारशी वाढ केली नाही. शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या प्रवेश आणि परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली. या शुल्कवाढीसाठी आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल तयार करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या शुल्कात वाढ झाल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
---
शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कात तीन वर्षांपूर्वी वाढ झाली आहे. शाळांचा सहभाग मात्र वाढल्यामुळे विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
- सुभाष सूर्यवंशी, शिष्यवृत्ती समन्वयक
--
आकडे बोलतात
वर्ष २०२३ -२०२४
- पाचवी विद्यार्थी संख्या - ७७४०
- आठवी विद्यार्थी संख्या - ६४०६
- एकूण - १४१४६

वर्ष २०२४ -२०२५
- इयत्ता पाचवी विद्यार्थी संख्या - ८४०९
- इयत्ता आठवी विद्यार्थी संख्या - ६००७
- एकूण - १४४१६
२०२५ -२०२६
- इयत्ता पाचवी विद्यार्थी संख्या - ९३८१
- इयत्ता आठवी विद्यार्थी संख्या - ५८७८
- एकूण - १५,२५९
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 4th T20I : शुभमन गिल खेळणार नाही, मैदानातही पोहचला नाही; मोठं कारण आलं समोर

SHANTI Bill: अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा! शांती विधेयक लोकसभेत मंजूर; का ठरणार गेमचेंजर?

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : तेलंगणा विधानसभा अध्यक्षांनी पाच याचिकांच्या संदर्भात अपात्रता याचिका फेटाळून लावली

SCROLL FOR NEXT