पिंपरी, ता. १९ : मोशी येथील विजय चौधरी यांची भारतीय जनता पक्षाच्या भारतीय कामगार पक्षाच्या कामगार मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष ॲड. विजय हरगुडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. विविध क्षेत्रांतील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच श्रमिकांना जोडून घेण्यासाठी या पदावर नियुक्ती केल्याचे ॲड. हरगुडे यांनी पत्रात नमूद केले आहे.
-----