पिंपरी-चिंचवड

काँग्रेस पक्षाने मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

CD

पिंपरी, ता. २० ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शहराच्या दृष्टीने काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच समन्वय समिती स्थापन केली. आता काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवणे सुरू केले आहे. रविवारपर्यंत (ता. २१) उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेसचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांचा निवडणुकीबाबत रविवारी दौरा होत आहे. परिणामी पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला सुरवात करत एक पाऊल पुढे टाकले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस समितीमधील जे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छितात व ज्यांनी अगोदर पक्ष कार्यालयात अर्ज दाखल केला आहे आणि त्यासोबत ज्यांनी उमेदवारी अर्ज शुल्क भरले आहे, त्यांनी अर्ज व पावतीची प्रत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सरचिटणीस बाबू नायर यांच्‍या यशवंतनगर येथील जनसंपर्क कार्यालयात जमा करावी, असे कळविण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांना संपूर्ण माहितीसह रविवारपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज सादर करावे लागणार असल्याचे सरचिटणीस ॲड. अमित कारंडे यांनी पत्रकामध्ये नमूद केले. ज्यांनी आजवर उमेदवारी अर्ज सादर केलेले नव्हते, अशा सामान्य नागरिक, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी वरील ठिकाणी उमेदवारी अर्ज नव्याने सादर करावेत, अशी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT