पिंपरी-चिंचवड

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध उभारलेली राष्ट्रवादी चळवळ

CD

पिंपरी, ता. २४ ः ‘महर्षी दयानंद सरस्वती यांनी १५० वर्षांपूर्वी स्थापन केलेला आर्य समाज म्हणजे तत्कालीन काळात असणाऱ्या अंधश्रद्धेविरुद्ध सुरू केलेली एक राष्ट्रवादी चळवळ आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आर्य समाजाचे उल्लेखनीय योगदान आहे,’’ असे प्रतिपादन जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांनी केले.
पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी येथे तीन दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. या उपक्रमात रक्तदान शिबिर, स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन व अमृतसर पंजाब येथील पंडित दिनेश आर्य यांचे भजन, यज्ञ हवन, पुरस्कार वितरण, महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. समारोपाच्या दिवशी आर्य समाज चळवळीत विशेष योगदान देणारे उत्तम दंडिमे, शकुंतला दंडीमे, लक्ष्मी कलबुर्गी, रमेश वासवानी, वीणा वासवानी, रमेश धर्माणी, मीना धर्माणी, श्रुत चव्हाण, शुभलता चव्हाण यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
‘राष्ट्र निर्माण मे हमारे कर्तव्य’ या विषयावर स्वामी सच्चिदानंद यांनी प्रवचन दिले. पंडित दिनेश आर्य यांनी सुश्राव्य वाणीमध्ये भजन केले. अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी डॉ. दि. मा. मोरे, पिंपरी संस्थेचे मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी, अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, हरेश तिलोकचंदानी, अतुल आचार्य, दिनेश यादव, उत्तम दंडीमे, जयराम धर्मदासानी, दिगंबर रिद्धीवाडे, संजय वासवानी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीला ICC कडून झाली शिक्षा! काय झालेली चूक?

Pune Cyber Fraud : ड्रेनेज दुरुस्त करायला आलेल्या व्यक्तीने ७ कोटी लुटले, पुण्यात सायबर चोरीचा नवा चक्रावणारा प्रकार समोर

Kolhapur Wild Animal : अवघ्या ७ वर्षीय राजवीरचा बळी गेला, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत काय केलं; सर्किट बेंचकडून राज्य सरकारला विचारणा

बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो...! पूजा सावंतचे अदा पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या डान्सचा viral video

Amravati Crime: खून करून कालव्यात जाळला मृतदेह; जहानपूर येथील घटना ,वाहनाच्या टायरचे निशाण

SCROLL FOR NEXT