पिंपरी-चिंचवड

वृक्षदाई व्याख्यानमालेतून पर्यावरण संवर्धनाचा जागर

CD

देहू, ता. २६ ः वृक्षदाई प्रतिष्ठान व देहू नगरपंचायत आणि श्री संत तुकाराम देवस्थान यांच्यावतीने २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान वृक्षदाई व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. देहूतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी दिली.
जागतिक तापमानवाढ, ओझोनचा हास, आम्लवृष्टी, सागरी प्रदूषण, नद्यांचे प्रदूषण आणि जैव विविधतेचा झपाट्याने होणारा ऱ्हास या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय समस्यांबाबत प्रबोधन व्हावे, यासाठी पर्यावरणीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. सोमवारी (ता. २९) प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे हे ‘चला वृक्षारोपण करू, निर्सगाशी नाते जोडू’ या विषयावर पुष्प गुंफणार आहे. मंगळवारी (ता. ३०) प्रसिद्ध जलतज्ज्ञ सतीश खाडे हे ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर तर बुधवारी (ता. ३१) सागर मित्र विनोद बोधनकर हे प्लॅस्टिक कचरा निर्मूलन सहभाग व चळवळ’ यावर व्याख्यान देणार आहेत.
यंदाचा ‘जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली सेवा पुरस्कार’ नाम फाउंडेशन संस्थेस आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्र्स्टचे अध्यक्ष सुनील रासने असणार आहे. तसेच ‘पद्मश्री डॉ. सु. वि. मापूसकर निर्मल सेवा पुरस्कार सेवा सहयोग फाउंडेशन संस्थेस खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bawankule recalls Atalji's words : भाजपच्या घवघवीत यशानंतर बावनकुळेंनी अटलजींच्या 'त्या' वाक्याची करून दिली आठवण!

BCCI CENTRAL CONTRACT FOR 2025-26: रोहित शर्मा, विराट कोहली A+ मधून थेट B ग्रेडमध्ये; शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा अव्वल श्रेणीत

Zilla Parishad BJP Performance : राज्यात अव्वल ठरलेला भाजप 'या' जिल्हापरिषदेत मात्र थेट चौथ्या स्थानावर घसरला!

Maharashtra Politics: नगर परिषद, महानगरपालिका ते जिल्हा परिषद; भाजपची हॅटट्रिक, देवेंद्र–रविंद्र जोडी पुन्हा नंबर 1!

Video Viral: हा कसला 'देवदास'; तो तर रोज 'पारो' बदलतो! आशिष नेहराचे On Air हार्दिक पांड्याबद्दल वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT