पिंपरी, ता.२७ ः नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२६ मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या दृष्टीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चाचणीसाठी पाच, सहा आणि सात जानेवारी रोजी खेड, १२, १३ आणि १४ जानेवारी रोजी मंचर, १९, २० आणि २१ जानेवारी रोजी जुन्नर, २७ आणि २८ जानेवारी रोजी वडगाव मावळ आणि २९ आणि ३० जानेवारी रोजी लोणावळा येथे दौरा होणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता कोटा उपलब्ध होणार असल्याची माहिती परिवहन कार्यालयाने दिली आहे.