पिंपरी, ता. २७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांकडे थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र उमेदवारांना मिळावे म्हणून माहिती व तंत्रज्ञान विभागाने ऑनलाइन अर्जप्रणाली विकसित केली आहे. याबाबत माहिती देणारी चित्रफीत महापालिकेच्या pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याद्वारे ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले. ऑनलाइन अर्जाची संबंधित विभागांमार्फत तपासणी करून त्याच प्रणालीतून ना हरकत प्रमाणपत्रे दिली जातील. त्यानुसार उमेदवारांना एकच सर्वसमावेशक ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात येईल. उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडणे ते जोडणे बंधनकारक आहे. विविध विभागांचे स्वतंत्रपणे ना हरकत दाखले सादर करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील सूचना यापूर्वीच आयुक्त तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली असून २४ डिसेंबरला झालेल्या बैठकीत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली, अशी माहिती उपायुक्त तथा नोडल अधिकारी राजेश आगळे यांनी दिली.
-----