पिंपरी, ता. २९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केला. पण, त्यामुळे पिंपरी कॅम्प परिसरातील सिंधी व इतर व्यापारी बांधवांवर अन्याय होणार आहे. रस्ते रुंदीकरण झाल्यास व्यवसाय धोक्यात येईल. व्यापाऱ्यांना विस्थापित व्हावे लागेल, अशी भीती व्यक्त करत या प्रारूप विकास आराखड्यावर पिंपरीतील व्यापारी संघटनेने हरकत घेतली आहे.
याबाबतचे पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. तसेच पिंपरी कॅम्प परिसराला ‘गावठाण’ घोषित करून गावठाणाच्या सेवा-सुविधा द्याव्यात, अशीही मागणी पत्रात करण्यात आली आहे. यावेळी व्यापारी सुरेश शर्मा, जगदीश आसवानी, आकाश बजाज, सावल तोतानी, नीरज चावला, रमेश जधवानी, दीपक सोनाजी, अर्जुन मेलवानी, जयराम नागदेव, सुनील हिंगोरानी, रवी गोरवानी, अवि तेजवानी आदी उपस्थित होते.
यामध्ये साई चौक, पिंपरी (शनिमंदिर - वैष्णोदेवी मंदिर) ते लालबहादूर शास्त्री उद्यान; साई चौक पिंपरी ते भाटनगर चौक; रेल्वे स्थानक (साईबाबा मंदिर क्रांती रिक्षा स्टॅन्ड) ते स्व. किंमतराम आसवानी भुयारी मार्गापर्यंत; लाल बहादूर शास्त्री उद्यान ते साधू वासवानी रस्ता; लालबहादूर शास्त्री उद्यान ते अशोक थिएटर; अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्त्यापर्यंत; काळेवाडी पूल (पवना नदी जवळून) ते पवनेश्वर मंदिर पूल; रिव्हर रस्ता (स्टेट बँक ऑफ इंडिया) ते मिलिंदनगर; डीलक्स थिएटर रस्ता ते नऊ मीटर रस्त्यापर्यंत; रवी सोसायटी ते अशोक थिएटर या पिंपरी कॅम्पमधील अंतर्गत रस्ते सद्यपरिस्थितीत आहे असेच ठेवावेत. त्यात बदल करू नये, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे रस्ते आणखी रुंद केल्यास येथील व्यापाऱ्यांच्या रोजीरोटीचा व निवासाचा प्रश्न निर्माण होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.