पिंपरी, ता. २८ : प्रेमप्रकरणात नकार सहन न होणे, ‘ब्रेकअप’चा राग यातून दोघांमध्ये वाद होतात. अन् या वादात प्राणघातक हल्ला व जीव घेण्यापर्यंत मजल जात आहे. अशा घटना मागील काही दिवसांत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतही घडल्या आहेत. मात्र, कुणाच्याही आयुष्यातील प्रेमाचं अपयश हे आयुष्याचे अपयश नसून त्यातील एक टप्पा आहे. त्यामुळे, कोणी आपल्याला नाकारले म्हणून स्वतःला किंवा दुसऱ्याला संपवू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका, असा सल्ला समुपदेशकांनी तरुणाईला दिला आहे.
अशा घटना का घडतात ?
- भावनिक अपरिपक्वता :
प्रेम म्हणजे ‘संपूर्ण आयुष्य याच व्यक्तीभोवती फिरलं पाहिजे’ ही चुकीची धारणा
- नकार न पचवण्याची असमर्थता
- एकदा नकार मिळाला की स्वतःची किंमत, आत्मसन्मान हरवतो आणि राग/हिंसा व्यक्त होते
- अहंकार : ती मला नाही मिळाली; तर कुणालाच मिळू नये ही मानसिकता हिंसेकडे नेते.
- समाज आणि प्रतिष्ठेचा दबाव : लोक काय म्हणतील, बदनामी होईल, ‘हसतील’ या भीतीतून टोकाचे निर्णय
परिणाम
• मृत्यू / हत्या / आत्महत्या
• तुरुंगवास
• कुटुंबीयांचे भावनिक व मानसिक जीवन उद्धवस्त
• समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण
• दुसऱ्यांना प्रेम किंवा नात्याविषयी नकारात्मक अनुभव
उपाय
प्रतिबंध आणि मार्गदर्शन :
- भावनिक शिक्षण : ‘नकार स्वीकारणं’, ‘स्वतःची किंमत ओळखणं’ यावर मार्गदर्शन हवे
- समुपदेशन आणि संवाद : क्लासेस, महाविद्यालये, पोलिस ठाण्यांत समुपदेशक विभाग असावेत. प्रेमात अडचण असेल तर गुप्ततेने मदत मिळावी
- पालक आणि शिक्षकांची भूमिका : तरुण मुलांशी संवाद वाढवणे, विश्वास देणे, भावनात्मक आधार देणे
- कायद्याची कडक अंमलबजावणी : बदनामी, जबरदस्ती यांना कठोर शिक्षा, तक्रारी लगेच ऐकल्या जाव्यात
प्रेमात जेव्हा अतिरेक, अनावश्यक अपेक्षा आणि असहायता मिसळते; तेव्हा ती भावना विध्वंसक ठरते. कुणाच्याही आयुष्यात प्रेमाचे अपयश हे आयुष्याचे अपयश नसून एक टप्पा आहे. त्याला संवाद, समुपदेशन आणि आत्मभानाची गरज आहे. तरुण पिढीने आपल्या भावनांची जबाबदारी घेतली पाहिजे आणि पालक-शिक्षकांनी संवाद, समजूत व समर्पणाच्या आधारावर त्यांना साथ दिली पाहिजे.
- वंदना मांढरे, समुपदेशिका
मागील दोन महिन्यांतील घटना
२० मे
चाकणजवळील बिरदवडी येथे प्रेम प्रकरणातून तीस वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीच्या पतीने दांडक्याने बेदम मारहाण करून खून
११ जून
देहूरोडमधील थॉमस कॉलनी येथे प्रेमाच्या त्रिकोणातून सोळा वर्षीय मुलाचा खून. गळ्यावर चाकूने वार करून संपवले
१२ जून
इंदोरी येथे प्रेम संबंधाच्या कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाचा एका तरुणीकडून हात-पाय बांधून क्रिकेट बॅटने मारहाण करत खून
१९ जून
प्रेम प्रकरणावरून एका रिक्षा चालकावर तिघांचा प्राणघातक हल्ला. सांगवीतील रक्षक चौकील प्रकार
२५ जून
तळवडे येथे प्रेमप्रकरणातून एक महिला आणि पुरुषाचा दगडाने ठेचून खून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.