पिंपरी-चिंचवड

चोपडा हायस्कूलमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

CD

पिंपरी, ता. ३० ः श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमध्ये सन २०११-१२ च्या दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. कार्यक्रमाची सुरवात गुरुजनांचे औक्षण व सरस्वती पूजनाने झाली. प्राचार्य विक्रम काळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्राचार्य विक्रम काळे यांनी आजपर्यंतच्या शाळेच्या प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडून उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अंकुश खामगळ, सुभाष देवकाते, संतोष सुरवसे, उमाकांत काळे, गजानन हरिदास, श्रीकांत पाटील, बबन नाळे, गोरक्ष आगळे, सीमा जंगले, सुवर्णा सोनवणे, शमा शिकलगार, विजया गडचे, उज्वला कोळपकर, मनिषा लोखंडे, नीता कटारिया आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेसाठी उत्कृष्ट साउंड सिस्टिम भेट दिली. ॲड. गीतांजली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी भरत मांडोळे, अल्तमस शेख, फुरकान मुजावर, विष्णू निलंगे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT