पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्‍या तिजोरीत ५२२ कोटींची भर

CD

महापालिकेच्‍या तिजोरीत ५२२ कोटींची भर
- पहिल्या तिमाहीत ४ लाख १२ हजार जणांकडून मालमत्ता कर जमा

पिंपरी, ता. १ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. पहिल्या तिमाहीत जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जूनपर्यंत सवलती जाहीर केल्या होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे. पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जूनपर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. यंदा मात्र ३० जून २०२५ पर्यंत ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली झाली आहे.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने योग्य नियोजन केले. ‘सीएचडीसी’ प्रकल्पांतर्गत डेटा विश्लेषण करून त्याआधारे विविध माध्यमातून केलेली जनजागृती मोहीम राबवली. बचत गटांमार्फत घरोघरी मालमत्ता करांची बिले पोचवली. त्‍यामुळे ५२२ कोटींचा कर वसुलीचा टप्पा पार झाला आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : एका आठवड्यात १८०० रुपयांनी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Pune Crime : दारूसाठी पैसे न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न

Latest Marathi News Updates : मुंबई, ठाण्याला लुटणारे सरकारमध्ये, सजंय राऊत यांची टीका

CM Devendra Fadnavis : संतविचारांमुळेच संस्कृतीचे जतन, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन; आळंदीतील मंदिरावर सुवर्ण कलशारोहण

संतापजनक घटना! पोटच्या पोरानं आपल्या 65 वर्षीय वृद्ध आईवर दोन वेळा केला बलात्कार; खोलीत डांबून करत होता अत्याचार

SCROLL FOR NEXT