पिंपरी-चिंचवड

प्रांजलच्या यशामुळे पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल

CD

राहुल हातोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ : केनियातील नैरोबी येथे ज्युनियर रोलबॉल विश्वचषक २०२५ स्पर्धा नुकतीच पार पडली. यात सहभागी भारतीय महिला संघाचे नेतृत्व पिंपरी-चिंचवड शहराची कन्या प्रांजल जाधव हिने केले. या स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. यात प्रांजलने दाखविलेले नेतृत्वगुण आणि तिचा वैयक्तिक खेळ याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रांजल हिच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

खेळातील प्रवास :
प्रांजलने तिच्या वयाच्या आठव्या वर्षी स्केटिंगपासून आपल्या खेळाच्या प्रवासाची सुरुवात केली. खेळासोबतच आरोग्य व अभ्यास या दोन्ही गोष्टींमध्ये तिने उत्तम समतोल राखला. या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील तीन स्पर्धांमध्येही तिचा सहभाग होता.

कुटुंबाचा पाठिंबा :
प्रांजल चिंचवडमधील उद्योगनगर येथे राहते. तिचे वडील अरूण जाधव हे उद्योजक आहेत. आई मेघा यांनी कधी काळी कबड्डी खेळात सहभाग घेतला. पण, पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना थांबावे लागले. मात्र, प्रांजलच्या यशातून तिच्या आईचे स्वप्न पूर्ण झाले, अशी भावना आईने व्यक्त केली आहे.

शैक्षणिक यश :
प्रांजल हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ६९ टक्के गुण मिळवले असून आता अभियांत्रिकीमध्ये पदविका अभ्यासक्रम करण्याचा तिचा मानस आहे.

वरिष्ठ गटात पदार्पणाचे ध्येय
कनिष्ठ गटात यश मिळवल्यानंतर आता वरिष्ठ गटात पदार्पण करणे हे तिचे पुढील लक्ष्य आहे. तिची धाकटी बहीण सेजल देखील टेनिसमध्ये नाव कमावत आहे. प्रांजलच्या या यशाबद्दल संपूर्ण शहरातून आनंद व्यक्त करण्यात येत असून, तिच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक काढून गौरव करण्यात आला.

मुली या मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांनी आपले आरोग्य सांभाळले, तर अभ्यास आणि खेळ या दोन्ही बाबींमध्ये समतोल साधता येतो. आई-वडील आणि शिक्षकांचा पाठिंबा असल्यानेच मी इथपर्यंत पोहोचली. आगामी काळात सिनिअर गटात खेळून देशाचे नाव मोठे करणार आहे.
- प्रांजल जाधव, रोलबॉल खेळाडू
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसह उपनगरात मुसळधार! रस्त्यांवर पाणीच पाणी, लोकलसेवा विस्कळीत; घराबाहेर पडू नका, BMCचं आवाहन

C. P. Radhakrishnan VP Candidate : उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का? यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

Asia Cup 2025: संजू सॅमसन, शुभमन गिल की यशस्वी जैस्वाल, टीम इंडियात कोणाला मिळणार संधी? अश्विन म्हणतो...

Latest Marathi News Live Updates : पुण्यातील बाबा भिडे पूल 20 दिवसांसाठी खुला

नासा-इस्रोच्या NISAR ने गाठला मोठा टप्पा; उपग्रहाची छत्री उघडली, पृथ्वीला स्कॅन करून देणार 'या' 3 समस्यांवर माहिती

SCROLL FOR NEXT