पिंपरी, ता. २ : महापालिका शाळेतील शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांचा घोळ अजूनही सुरूच आहे. अनेक शाळांमधील रिक्त जागा दिसत नसल्याने प्राथमिक शिक्षक परिषेदेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लिंक खुली केल्याने अनेक शिक्षकांना आता रिक्त जागा दिसू लागल्या आहेत.
दरवर्षी एप्रिल व मे मध्ये शिक्षकांच्या बदल्यांची लगबग सुरू होते. आपल्याला सोईचे ठिकाण मिळावे, म्हणून शिक्षक संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. काही शिक्षकांच्या बदल्यावरून शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांमध्ये वाद झाला होता. परंतु आता शिक्षकांच्या बदल्यांसाठी काही शाळांमधील रिक्त जागा दाखविण्यात आल्या. परंतु अनेक ठिकाणच्या शाळा ऑनलाइन दिसत नसल्याने अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्या जागा रिक्त आहेत, त्या दाखवल्या नाहीत असा आरोप शिक्षकांनी केला होता. विषयनिहाय जागा दाखवल्या नाही. पुनावळे कन्या शाळेत मराठी शिक्षक बदली झाली. तेथे विज्ञान विषय रिक्त दाखवला जातो आहे. विधवा महिला, दिव्यांग पाल्य, सैनिक, पती-पत्नी एकत्रिकरण यांना प्राधान्य देणे आवश्यक होते. त्यावर प्राथमिक शिक्षक परिषेदेने बदलीपात्र शिक्षकांनी हरकती मागवल्या होत्या. यावर प्रशिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी पुन्हा लिंक सुरू केली आहे.
प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया पारदर्शक होणे अपेक्षित आहे. प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत अन्याय झालेला शिक्षकांनी व्हॉट्स ॲपवर अर्ज केले होते. ती परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तो प्रश्न सोडवला आहे.
-शरद लावंड, पुणे विभाग अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.