पिंपरी, ता.२ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चाकण केंद्राच्या वतीने राजगुरुनगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. आयुक्त रविराज इळवे मनोज पाटील, प्रभारी आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वृक्षमित्र अण्णा जोगदंड, शंकर नाणेकर, दत्तात्रय दगडे यांच्या उपस्थित वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कामगार वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण केले. याप्रसंगी विविध जातीची दुर्मिळ औषधी तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न देणारी उपयुक्त अश्या ५० रोपांचे वृक्षारोपण केले. नागेश दळवी, नितीन पाटील, तान्हाजी दरेकर, पाटीलबुवा गव्हाणे, अविनाश वाडेकर, संभांजी येळवंडे, प्रकाश पटारे, भरत उढाणे व सदाशिव आमराळे यांनी परिश्रम घेतले. कामगार कल्याण केंद्र संचालक अविनाश राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.