पिंपरी-चिंचवड

डास प्रतिबंधात्मक मोहिमेत दोन हजार १९६ ठिकाणी नोटिसा

CD

पिंपरी, ता. ४ ः डेंगी आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या डास प्रतिबंधात्मक मोहिमेर्तंगत आतापर्यंत दोन हजार १९६ ठिकाणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर, २५२ नागरिक व आस्थापनांकडून सात लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डेंगीचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध जनजागृती उपक्रम हाती घेण्यात आले असून, औषध फवारणीसह घरांची व कंटेनर तपासणी, घरे, भंगार दुकाने, खासगी आस्थापने, बांधकामाची ठिकाणे यांचीही पाहणी करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

आतापर्यंतची कारवाई
- दोन लाख ७० हजार ८८५ घरांच्या तपासणी; पाच हजार १७२ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण
- १४ लाख ४६ हजार ४५३ कंटेनर तपासणी; पाच हजार ६४१ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण
- ७१७ भंगार दुकानांची तपासणी
- ९८० बांधकामांच्या ठिकाणी अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास
- दोन हजार १९६ ठिकाणी बजावण्यात आल्या नोटिसा
- २५२ नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई; सात लाखांचा दंड वसूल

जनजागृती उपक्रम
- नियमित औषध फवारणी
- घरोघरी माहितीपत्रकांचे वितरण
- शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण
- प्रभागस्तरावर विशेष जनजागृती कार्यक्रम
- सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा

‘‘डेंगी, मलेरियाचा नायनाट करण्यासाठी जनजागृती करण्याबरोबरच, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी, तपासण्या आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी या उपक्रमात सहकार्य करून आपल्या परिसरातील स्वच्छता राखून या व्यापक मोहिमेस सहकार्य करावे.’’
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT