पिंपरी-चिंचवड

‘एआय’, ‘थ्रीडी प्रिंटिंग’मुळे बांधकाम क्षेत्रात नव‘प्रगती’

CD

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी थ्रीडी प्रिंटिंग, बीआयएम (बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ः आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या प्रगत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे. यामुळे प्रकल्पांची अचूकता साधणे, वेळ वाचवणे आणि खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बैठ्या घरांची, चाळी, वाड्यांची जागा बहुमजली इमारतींनी घेतली आहे. मोकळ्या जागांवरही गगनचुंबी इमारती उभ्या राहात आहेत. त्यांचे डिझाईन हाताने तयार करावे लागत होते. त्यासाठी अमर्यादित वेळ खर्ची पडत होता. त्यावर नियंत्रण मिळवणे व पहिल्या प्रयत्नात अचूकता साधणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेकदा नव्याने डिझाईन तयार करावे लागत. मात्र, थ्रीडी प्रिंटिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी वेळेत आणि कमी खर्चात अचूक डिझाईन तयार करणे शक्य झाले आहे. बांधकामांना लागणारे ब्लॉक्स, पिलर, भिंती, छोटे गृहनिर्माण घटक संगणकीय मशिनद्वारे तयार केले जातात. या प्रक्रियेमुळे मजुरांची संख्या कमी होऊन वेळ वाचवणे शक्य होत आहे.

अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे
- प्रकल्पाचा आराखडा ः आर्किटेक्ट बीआयएम सॉफ्टवेअर वापरून त्रिमितीय आराखडा तयार करतात
- संघटनात्मक समन्वय ः सर्व अभियंते एकाच मॉडेलवर काम करत असल्याने एकमेकांमध्ये समन्वय साधता येतो
- चुका टाळणे ः बांधकामाच्या आधीच डिजिटली चुका दुरुस्त करता येत असल्याने प्रत्यक्ष दुरुस्तीचा खर्च वाचतो
- कामाचा गतिशील अभ्यास ः कोणत्या टप्प्यावर कोणते काम होणार हे आधीच पाहता येते
- देखभाल ः प्रकल्प पूर्ण झाल्यावर देखभाल करणाऱ्या संस्थांना सर्व माहिती डिजिटल स्वरूपात मिळते

‘एआय’द्वारे प्रत्येक घटकावर नियंत्रण
बांधकाम प्रकल्पासाठी एआयद्वारे प्रकल्पाची डिझाईन, लागणारे मनुष्यबळ, साहित्यावर होणारा खर्च याचे विश्लेषण करून आराखडा तयार केला जातो. कोणत्या टप्प्यावर उशीर होणार, कुठे जास्त खर्च होतोय, याचा अंदाज आधीच बांधला जातो. कामाच्या ठिकाणी कॅमेरे व सेन्सर्सद्वारे कामगारांची हालचाल एआयद्वारे ट्रॅक केले जाते. अपघात टाळण्यासाठी संभाव्य धोके ओळखता येतात. इमारतींची यंत्रणा म्हणजे लिफ्ट, जनरेटर, इमारतीचे तापमान, आर्द्रता (हवेमधील ओलावा) आणि हवा शुद्ध ठेवण्याचे काम करणारी यंत्रणा केव्हा बिघडू शकते, याचा अंदाज एआयद्वारे लावला जातो. बीआयएम तंत्रज्ञानाद्वारे एचव्हीएसी डक्ट (हवा शुध्द ठेवण्याची यंत्रणा) कसे बसवायचे, त्याची लांबी, स्थान, मेंटेनन्स नियोजन केले जाते. प्रकल्पाचे निरीक्षण, मोजमाप, फोटो डॉक्युमेंटेशन ठेवण्यासाठी एआय सक्षम ड्रोन वापरले जाते. काही ठिकाणी एआयद्वारे विटा रचणे किंवा कॉंक्रिट ओतणे ही कामे देखील नियंत्रित केली जातात.

बांधकाम प्रकल्पाची थ्रीडी प्रतिकृती
बांधकाम प्रकल्पाच्या थ्रीडी प्रिटिंगचा आराखडा तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अत्याधुनिक मशिनला कमांड दिली जाते. मशिनमधून आराखडा जसाच्या तसा तयार होण्यासाठी ३० ते ४० तासाचा अवधी लागतो. त्यानंतर जागेवर इमारत उभी होण्यापूर्वी इमारतीची हुबेहूब प्रतिकृती समोर ठेवली जाते. इमारतीमधील एचव्हीएसी डक्ट (हवा शुद्ध ठेवण्याची यंत्रणा) कसे बसवायचे, त्याची लांबी, स्थान, लिफ्ट, जनरेटर, इमारतीचे तापमान, आर्द्रता (हवेमधील ओलावा), हवा शुद्ध ठेवणे, पर्यावरणीय समतोल कसा राखला जातो, या बाबी प्रकल्पाच्या प्रतिकृतीद्वारे दर्शविल्या जातात, अशी माहिती ऑटो क्लस्टरच्या एका अधिकाऱ्याने दिली.

बीएमआयचा प्रभावी वापर
बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (बीआयएम) या तंत्रज्ञानाच्या आधारे इमारत बांधण्यापूर्वी तिचे थ्रीडी डिजिटल मॉडेल संगणकावर तयार केले जाते. त्यामध्ये इमारतीचा केवळ आराखडाच नाही, तर इमारतीच्या भिंती, खिडक्या, दरवाजे, वीजेचे जाळे, पाइपलाइन,
सुरक्षा यंत्रणा, उष्णता नियंत्रण, पर्यावरण प्रभाव अशा अनेक बाबींचा समावेश असतो. त्याद्वारे आर्किटेक्ट, इंजिनिअर, कंत्राटदार, ग्राहक यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडले जाते. यामध्ये आता फोर डी आणि फाइव्ह डी बीआयएम तंत्रज्ञान आल्यामुळे कामाचे टप्पे व अंदाजे इमारत उभारण्याचा खर्च, याचे नियोजन करता येते. सेव्हन डी बीआयएम तंत्रज्ञानाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देखभाल करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

बांधकाम व्यावसायिक म्हणतात...
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे टाउनशिपचे डिजिटल मॉडेल बनवले आहे. डिजिटलायझेशनसोबतच फिजिटेबल ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्याद्वारे प्रकल्पाला भेट देणाऱ्या ग्राहकांना इमारतीचा आराखडा, तिच्या भिंती, खिडक्या, दरवाजे, वीजेचे जाळे, वातानुकूलित लिफ्ट, पाइपलाइन, सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था, उष्णता नियंत्रण, पर्यावरण प्रभाव अशा अनेक बाबी स्क्रीनवर दाखवल्या जातात. त्याचबरोबर एका क्लिकवर प्रकल्पाच्या निर्धारित परिघात असणाऱ्या शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, औषधालये, राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो स्टेशन, मार्केटची माहिती दाखवली जाते.
- आकाश अगरवाल, संचालक, क्रिसाला डेव्हलपर्स

फ्लॅट घेताना ग्राहकांना टच ॲण्ड फिलचा अनुभव अपेक्षित असतो. त्यासाठी प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या फ्लॅटची सॅम्पल प्रतिकृती तयार केली जाते. त्यामध्ये ग्राहकांना तो अनुभव घेता येतो. आता एआय टेक्नॉलॉजी आल्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी संपूर्ण प्रोजेक्ट आणि परिसरातील इतर बाबींची माहिती मिळते. आजपर्यंत थ्रीडी टेक्नॉलॉजीच्या आधारे ग्राहकांना प्रोजेक्टमधील इत्थंभूत बाबी ऑन स्क्रीन दाखवित आलो आहोत. पण, पुढील काळात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकांना माहिती देण्याचा मानस आहे. शहराची भौगोलिक माहिती नसणाऱ्या ग्राहकांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
- रोहन गायकवाड, संचालक, बिवेगा ग्रुप,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor injured: प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान मोठी दुखापत; पाटणामधील रूग्णालयात उपचार सुरू!

Shocking! अनेकांसोबत शारीरिक संबंध; १०० कोटी उकळले, 'ती' महिला नेमकी कोण? धक्कादायक सत्य समोर

Pahalgam attack: 'टीआरएफ'चा जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश; भारताकडून निर्णयाचं स्वागत

Raj Thackeray Warning Nishikant Dubey: ‘’दुबे तुम मुंबई मै आजाओ.., समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें...’’ ; राज ठाकरेंचा कडक पलटवार!

Sangli Poisoning : कर्जबाजारी कुटुंबाने उचलेले टोकाचे पाऊल! विषप्राशनाने सासू-सुनेचा मृत्यू, वडीलांसह मुलाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT