पिंपरी-चिंचवड

खड्डे बुजवण्यासह ‘ॲप’ वापराचे प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. २३ ः पाऊस व अन्य कारणांमुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यांचे निराकरण करून नागरी सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी महापालिकेच्या अभियंत्यांना डिजिटल प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ‘खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली’चा (Pothole Management App) वापर व खड्डे भरण्याच्या तंत्रज्ञान याचा समावेश आहे.
ऑटो क्लस्टर सभागृहात प्रशिक्षण झाले. शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, बापूसाहेब गायकवाड यांच्यासह स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनि:सारण व शहर दळणवळण विभागातील कार्यकारी अभियंते, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा १५७ अभियंत्यांचा प्रशिक्षणात समावेश होता. महापालिकेने खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. त्याअंतर्गत इंफ्रा प्रोजेक्ट्स इंडियाच्या सहकार्याने ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ अॅप विकसित केले आहे. यामुळे रस्त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यास अभियंत्यांनाही मोठी मदत होणार आहे. ही प्रणाली नागरिकांची जीवनशैली सुरक्षित करणारी आहे. तसेच महापालिकेच्या डिजिटल व तत्पर प्रशासकीय सेवेची साक्ष देणारी ठरणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तज्ज्ञ सल्लागार विकास ठाकर यांनी प्रशिक्षण दिले. उपअभियंता अश्लेष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

प्रणालीच्या माहितीसाठी प्रशिक्षण
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेने तयार केलेल्या ‘खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली’वर खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी अभियंत्यांनाही प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे. या उद्देशानेच महापालिका व इंफ्रा प्रोजेक्ट्स इंडिया यांच्यातर्फे प्रशिक्षणाचे देण्यात आले.

प्रशिक्षणाचा उद्देश
प्रशिक्षणात रस्त्यांवरील खड्डे शोधण्यापासून ते जलद गतीने त्याचे निवारण करण्याच्या प्रक्रियेपर्यंत प्रत्येक पायरीची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात खड्ड्यांमध्ये जलनिरोधक तंत्रज्ञानाचा वापर, तत्काळ यंत्रणेमार्फत प्रतिसाद देणे आणि पाणीपुरवठा, जलनिःसारण आणि रस्ते विभागांच्या समन्वय साधणे या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

प्रशिक्षणात वैशिष्ट्ये
- ‘पॉटहोल मॅनेजमेंट अॅप’ कसे वापरावे
- जलनिरोधक खड्डे भरणी तंत्रज्ञानाबाबत माहिती
- तक्रारीवर तत्काळ प्रतिसादासाठी ऑटो मेकॅनिझम प्रणालीबाबत माहिती
- रस्ता, जलनि:सारण व पाणीपुरवठा विभागातील समन्वयाचे नियोजन
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओम शांती, शांती ओम; सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या राष्ट्रपतींनी भाषणाचा 'असा' केला समारोप; पाहा VIDEO

Success Story: बकरीच्या दुधापासून बनवलं नैसर्गिक साबण, जूली देवींनी ३ महिन्यांत कमवले तब्बल ६ कोटी, हजारो महिलांना मिळाला रोजगार

Latest Marathi News Live Update : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा अहमदनगर दौरा; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

Garba and Dandiya Nights: भारतात 'या' 6 शहरांमध्ये असते गरबा-दांडियाची धूम, नवरात्रीत मित्रांसह एकदा नक्की भेट द्या

Jalna Fire News : महापारेषणच्या सब स्टेशनला भीषण आग; औद्योगिक वसाहतीतील विद्युत पुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT