पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीत ३४ हजार मिळकतकर बुडवे

CD

पिंपरी, ता. २५ ः उद्योगनगरी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील सात लाख ३१ हजार मिळकतींची महापालिकेकडे नोंद आहे. त्यातील तब्बल ३४ हजार २२ मिळकतधारकांनी आतापर्यंत एकदाही मिळकतकर भरलेला नसल्याचे आढळून आले आहे. अशा मिळकतकर बुडव्यांवर महापालिकेने कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांचा समावेश आहे.
मालमत्ता बिलासोबत थकबाकीदारांना नोटीस बजावल्या आहेत. तरीही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर महापालिका मिळकत जप्तीची कारवाई करणार आहे. ज्या निवासी मिळकतधारकांकडे पाच किंवा दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून थकबाकी आहे, अशा निवासी मिळकतीतील जंगम म्हणजे कार, टीव्ही, फ्रिज व घरातील महागड्या वस्तू जप्त करण्याची कारवाई कर संकलन विभागाने सरू केली आहे.

चार टक्के सवलत
महापालिकेचा मिळकतकर एक जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ याकाळात ऑनलाइन भरल्यास मिळकतधारकांना सामान्य करावर चार टक्के सवलत मिळणार आहे. ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांनी तात्काळ कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

दृष्टिक्षेपात मिळकती
एकूण ः ७,३१,०००
चालू वर्षाचा कर भरलेले ः ४,२६,०००
एकदाही कर न भरलेले ः ३४,०२२

मिळकतकर कोटी रुपयांत
पहिल्या तिमाहीत वसूल (एप्रिल ते जून २०२५) ः ५२२
निवासी मिळकतधारकांकडे ः ३१०
कर संकलन विभागाचे उद्दिष्ट ः १३००

थकबाकीदार संख्या
५० हजार रुपयांपेक्षा अधिक ः २८,५१८
एक लाखांहून अधिक ः ९,१४७
पाच लाखांपेक्षा अधिक ः ८७५
निवासी मिळकतधारक ः १,१२,८०९

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अद्यापही काही मिळकतधारकांनी एकदाही कर भरलेला नाही. अशांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रसंगी जप्तीची कारवाई अटळ आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

चालू आर्थिक वर्षासाठी १३०० कोटी रुपये मिळकतकर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. नागरिकांनी ऑनलाइन भरणा करून चार टक्के कर सवलतीचा लाभ घ्यावा. मोबाईलवरून सहज कर भरता येत असल्याने सर्वांनी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी मिळकत बिलाशी जोडावा, त्यामुळे गरबसल्या सर्व सुविधा मिळतील.
- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT