पिंपरी-चिंचवड

‘एचएसआरपी’चा दंडक फक्त खासगी वाहनानांच?

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ ः राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा वाहन क्रमांक पाटी (एचएसआरपी) बंधनकारक झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे अडीच लाख वाहनमालक ‘एचएसआरपी’ बसवून घेण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करीत आहेत. शासकीय आस्थापनांचे मात्र ही पाटी बसविण्याकडे दूर्लक्ष झाल्याचे दिसते. त्यामुळे हा दंडक फक्त खासगी वाहनांनाच आहे का, असे कोडे सामन्य नागरिकांना पडले आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या बहुतांश वाहनांबरोबरच इतर शासकीय आस्थापनांच्या बहुतेक वाहनांना अजूनही एचएसआरपी लावण्यात आलेली नाही. परिवहन विभागाने एक जानेवारीपासून ‘एचएसआरपी’ बसविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. हे काम तीन खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत राज्यातील ५६ प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत ‘एचएसआरपी’ उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर सामान्य वाहनचालकांना दंड ठोठावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या बहुतांश वाहनांवर ही पाटी नाही.
---
दृष्टिक्षेपात
- २४ लाख १५ हजार ५१ः पिंपरी-चिंचवड आरटीओकडील वाहनांची नोंद
१५ लाख ३९ ः २०१९ पूर्वीची वाहने
३ लाख ८६ हजार ६८३ ः ‘एचएसआरपी’साठी नोंद झालेली वाहने
- २ लाख ५१ हजार १२५ ः ‘एचएसआरपी’ बसविलेली वाहने
१७ टक्के ः ‘एचएसआरपी’ बसविलेल्या वाहनांचे प्रमाण
- ८ महिने ः आदेश निघाल्यापासूनचा कालावधी
(१३ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी)
---
या शासकीय वाहनांवर ‘एचएसआरपी’ नाही
- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)
- वाहतूक पोलिसांची वाहने
----------
खासगी आणि शासकीय या सर्वांसाठी नियम सारखे आहेत. २०१९ पूर्वीच्या सर्वच वाहनचालकांनी १५ ऑगस्टपूर्वी ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावे. शासकीय आस्थांपनांनी देखील त्यांची वाहनांची नोंदणी करुन लवकरात लवकर ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT