पिंपरी-चिंचवड

घोरावडेश्वर डोंगरावरील ३०० वृक्षांना जीवदान

CD

सोमाटणे, ता. ३० : घोरावडेश्वर देवस्थान व आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर लावलेली ३०० झाडे जगवण्यात यश आले आहे.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने ‘हरित घोरावडेश्वर’ हा संकल्प विचारात घेऊन २६ ऑगस्ट २०१९ रोजी १०१ झाडे लावली. त्यानंतर २०२ अशी ३०३ औषधी वनस्पती, अजान वृक्ष, रुद्राक्ष, बेल, देवचाफा आदी प्रकारची झाडे लावण्यात आली होती. डोंगरावरील जागा ही उताराची, मुरमाड आणि कमी मातीची तसेच अपुऱ्या पाण्याची आहे. त्यामुळे उन्हाळ्यात झाडे जगवणे कठीण होते. यावर विद्यार्थी व घोरावडेश्वर देवस्थानाने गेल्या पाच वर्षांत पाण्याचे नियोजन केले. उन्हाळ्यात प्रत्येक झाडांना त्यांच्या गरजेप्रमाणे पाणी दिले व उन्हापासून संरक्षणासाठी प्लॉस्टिकचे आवरण लावले. यामुळे गेल्या पाच वर्षांत झाडांना संरक्षण मिळाले. त्यामुळे त्यांची चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ती जगण्यास सक्षम झाली आहेत. आता पाऊस चांगला झाला असल्याने झाडे बहरली आहेत.

PNE25V35712

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elephants Padma Menaka Dhruv : नांदणीनंतर 'या' मठांचे ३ हत्तीही जाणार? हायकोर्टाकडून नोटीस, शेडबाळ मठाच्या हत्तीचा समावेश

'माझ्यासाठी सिनेमा अनेक वर्ष पुढे ढकलला' पिळगांवकरांनी काढली दिग्दर्शकाची आठवण, म्हणाले,'माझ्यासोबत चित्रपट करणं त्यांची शेवटची इच्छा..'

Mumbai Local Viral Photo : एसी लोकलमध्ये प्रवाशाचा भन्नाट कारनामा; चक्क ट्रेनमध्ये छत्री उघडून प्रवास करतानाचा फोटो व्हायरल!

Beed News: कोरोनातली उधळपट्टी चौकशीच्या फेऱ्यात; बारा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, सकाळ’ने वृत्तमालिकेतून टाकला होता प्रकाश

Ahilyanagar News: 'डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागेची पाहणी प्रक्रियेला गती'; राजकीय श्रेयावरून वादाची ठिणगी

SCROLL FOR NEXT