पिंपरी-चिंचवड

वैद्यकीय सुविधांच्या हक्कापासून कामगार वंचित

CD

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १ ः पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक उद्योग व व्यावसायिकांनी त्यांच्या कामगारांचा ईएसआय (कर्मचारी राज्य विमा) निधी राज्य कामगार विमा मंडळाकडे जमा केलेला नाही. नियमानुसार दहा किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या प्रत्येक उद्योग, व्यावसायिकाला ईएसआय निधी वेळेवर भरणे आवश्यक असते. मात्र, अनेक जण निधी भरत नसल्यामुळे त्यांच्या कामगारांना ईएसआयअंतर्गत मोफत वैद्यकीय सेवा, तपासणी, औषधे व उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.
सुरक्षा आणि संरक्षणासाठी केंद्र सरकारच्या कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजनेचा कामगारांना मोठा आधार आहे. याअंतर्गत कामगारांना मोफत आरोग्य सेवा, औषधे, शस्त्रक्रिया, मातृत्व सेवा, अपघात विमा आणि निवृत्तीनंतरही काही सेवा दिल्या जातात. मात्र, पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील हजारो उद्योग व व्यावसायिक ईएसआय निधी भरत नसल्याचे आढळून आले आहे. भोसरी, आकुर्डी, चिखली, मोशी, तळवडे, हिंजवडीसह शहराच्या विविध भागात लघु व मध्यम उद्योगांचे जाळे आहे. मोठे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे दहापेक्षा जास्त कामगार कार्यरत आहेत. नियमानुसार, अशा आस्थापनांनी प्रत्येक कामगाराच्या पगारातून काही रक्कम कपात करून ती निधी म्हणून कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे. उद्योग किंवा व्यावसायिकांनाही त्यांच्या हिस्सयाची रक्कम जमा करावी लागते. मात्र, अनेक लघु उद्योग व काही मोठे उद्योजक निधी कपात करूनही तो जमा करत नाहीत किंवा निधीच न भरता नियम धाब्यावर बसवत आहेत.

कायदा किंवा नियम काय सांगतो
- राज्य कामगार विमा मंडळाच्या नियमानुसार, कामगारांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात करणे
- प्रत्येक कामगाराच्या ईएसआयसाठीचा उद्योजकांनी स्वहिस्सा भरणे आवश्यक
- कामगार व मालक यांच्या हिस्स्याची रक्कम ईएसआयकडे नियमितपणे जमा करणे बंधनकारक

ईएसआय निधी न भरण्याचे परिणाम
- कामगारांचे ईएसआय कार्ड निष्क्रिय होत आहेत
- ईएसआय रुग्णालये व दवाखान्यांकडून मोफत उपचारास नकार
- खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नसल्याने उपचारांपासून वंचित
- आवश्यक परिस्थितीत औषधोपचारांसह शस्त्रक्रियांचा खर्चाचा कामगारांना भुर्दंड
- मोफत वैद्यकीय सेवा, अपघात विमा आणि इतर लाभांपासून कामगार वंचित

अशी होते रक्कम कपात
- कामगारांच्या पगारातून पगाराच्या १.७५ टक्के
- संबंधित कंपनीकडून ४.७५ टक्के
- एकूण ईएसआय निधी भरणा ः ५.५ टक्के

ईएसआय नियमांतर्गत येणारे उद्योग
- उद्योग व उत्पादन क्षेत्र ः इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, ऑटोमोबाईल व स्पेअर पार्ट्स कंपन्या, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक, प्लास्टिक, रबर, टायर कारखाने, फर्निचर व लाकूड उत्पादन
- कापड व गारमेंट उद्योग ः गारमेंट फॅक्टरी, सिलाई युनिट्स, रेडीमेड कपडे व युनिफॉर्म उत्पादक, कापड विक्री दुकाने
- औषध व रसायन उद्योग ः फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग, केमिकल व पेंट उत्पादक, कॉस्मेटिक उत्पादन युनिट
- अन्न व पेय पदार्थ प्रक्रिया उद्योग ः बिस्कीट, ब्रेड, स्नॅक्स कारखाने, डेअरी व दूध प्रक्रिया, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स उत्पादन
- हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय ः मोठे रेस्टॉरंट, हॉटेल्स, केटरिंग कंपन्या
- शिक्षण व आरोग्य संस्था ः खासगी शाळा व कॉलेज (नफा मिळवणाऱ्या), नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स, डायग्नॉस्टिक सेंटर्स
- खासगी सुरक्षा व सुविधा सेवा ः सिक्युरिटी एजन्सीज, हाऊसकीपिंग व स्वच्छता सेवा कंपन्या, लॉजिस्टिक व कुरिअर सेवा
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व बीपीओ ः आयटी कंपन्या, कॉल सेंटर्स व बीपीओ कंपन्या
- बांधकाम व रियल इस्टेट क्षेत्र (विशिष्ट प्रकल्पांमध्ये) ः काही स्थायी प्रकल्प किंवा कारखाने, कंट्रॅक्टर्सचे स्थायी ऑफिसेस

दहापेक्षा अधिक कामगारांच्या आस्थापना
- वाणिज्य ः ६०,७००
- औद्योगिक ः ४,७००
- बांधकाम प्रकल्प ः ५,५००
- हॉटेल्स ः ३५०
- रेस्टॉरंट ः १५०

उद्योगनगरीतील कामगार
- एकूण कामगार (सुमारे) ः १४,२८,०००
- ईएसआय नोंदणी ः ६,५०,०००
- ईएसआय नोंदणी नसलेले (सुमारे) ः ७,७८,०००
(ईएसआय नोंदणीकृत कामगारांसह नोंदणी असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना ः स्वतः, पती किंवा पत्नी, दोन मुले, आई, वडील ः यांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळतो)

ईएसआय सुविधा सर्व व्यवसाय आणि उद्योगांना लागू आहे. संबंधित आस्थापनांनी दहापेक्षा अधिक कामगार असतील, तर त्यांचे ईएसआय शुल्क जमा करणे बंधनकारक आहे. परंतु, मोठ्या प्रमाणात उद्योजक आणि व्यावसायिक शुल्क जमा करत नाहीत. परिणामी, कामगारांचे प्रचंड नुकसान होत आहे.
- डॉ. वर्षा सुपे, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : तरुणाने गाठला निर्दयतेचा कळस ! जिवंत अजगर बाईकला बांधले, ५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले अन्...व्हिडिओ व्हायरल

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड मॅनेजमेंटमुळे भारताची वाढलीय डोकेदुखी!

Beed Case Updates: कसून चौकशी करण्याची मागणी; Dhananjay Deshmukh बघा काय काय म्हणाले? | Sakal News

Tejas Gadade : गोदावरीच्या लाटांवरून थेट जर्मनीपर्यंत! नाशिकचा तेजस गडदे भारतासाठी सज्ज

Latest Maharashtra News Updates Live: चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटले नाही जाणूनबुजून म्हंटले आहे : नरेश म्हस्के

SCROLL FOR NEXT