पिंपरी-चिंचवड

स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत मॅस्कॉट डिझाईन स्पर्धा

CD

पिंपरी, ता. १ ः पिंपरी-चिंचवडला स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये देशात सातवा व राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. आता स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ स्पर्धेची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत स्वच्छतेचा नवा चेहरा शोधण्यासाठी ‘मॅस्कॉट डिझाईन’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात पाच ऑगस्टपर्यंत सहभाग नोंदवता येणार आहे.
स्वच्छ भारत व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित ‘मॅस्कॉट डिझाईन’ स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून विजेत्या डिझाईनचा वापर महापालिकेच्या सर्व अधिकृत माध्यमांवर केला जाणार आहे. त्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

स्पर्धेचे नियम
- एक व्यक्ती फक्त एक डिझाईन पाठवू शकते
- डिझाईन पूर्णतः मूळ व स्वयंनिर्मित असावे
- स्वच्छता, आरोग्य, जबाबदारी, लोकसहभाग, प्लॅस्टिकमुक्ती, कचरा विलगीकरण आदी विषय आहेत
- डिझाईन प्रेरणादायी, संस्कृतीशी सुसंगत असावे
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

असा घ्या सहभाग
- https://forms.gle/K7L2hN6eS4V3LYto6 या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा
- स्पर्धकाचे नाव, ई-मेल, मोबाईल, पत्ता ही माहिती भरून मॅस्कॉट डिझाईन अपलोड करावे
- डिझाईन मागची संकल्पना थोडक्यात लिहावी आणि अर्ज सबमिट करावा

‘‘महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आयोजित मॅस्कॉट डिझाईन स्पर्धा स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अनुषंगाने तयारीचा एक भाग आहे. नागरिकांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी, स्वच्छतेबाबत सजग करण्यासाठी ती उपयुक्त ठरेल.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women World Cup 2025: ४७ वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार? महिलांचा एकदिवसीय विश्‍वकरंडक आजपासून; भारत-श्रीलंका सलामीची लढत

Jammu Kashmir Tourism: पर्यटकांसाठी खुशखबर! आता जम्मू- काश्मीरमधील ७ प्रसिद्ध स्थळे पुन्हा सुरु, जाणून घ्या कोणती?

Mumbai News: धारावीचा पुनर्विकास मुंबईसाठी डबल धोक्याचा, वाहतूक कोंडी अन् पुराचा फटका बसण्याची भीती

Satara Crime: 'वेगवेगळ्या गुन्ह्यांतील सराईत दाेघेजण जेरबंद'; पाच वर्षांपासून पोलिसांना देत हाेता गुंगारा

Amal Mahadik Vs Satej Patil : ‘राजाराम’ सहकारी कारखान्यांच्या वार्षिक सभेत गदारोळ, सतेज पाटील समर्थकांची समांतर सभा

SCROLL FOR NEXT