पिंपरी-चिंचवड

‘काळा घोडा’ कला महोत्सवासाठी चार शाळांची निवड

CD

पिंपरी, ता. ३० : मुंबई येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या ‘काळा घोडा’ कला महोत्सवासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चार प्राथमिक शाळांची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली कला मॉडेल्स महोत्सवातील प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत.

महापालिकेच्या शाळांमधील ११ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉडेल्स तयार केली आहेत. यासाठी निवडलेले विषय हे केवळ कलात्मक नसून मानवी जीवन, विचारप्रक्रिया आणि आधुनिक शहरी संकल्पनांवर आधारित आहेत. यामध्ये ‘अंतर्गत वळण’, ‘मानवी विचारांचे रोलरकोस्टर’, ‘रुपांतरण : जीवनाचे रोलरकोस्टर’ तसेच ‘स्कायवॉक : मर्यादांच्या पलीकडचे शहर’ या विषयांचा समावेश आहे. या संकल्पनांमधून विद्यार्थ्यांनी मानवी मनातील चढउतार, जीवनातील बदल आणि शहराच्या विकासाच्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या आहेत.
१९९९ पासून सुरू असलेला काळा घोडा कला महोत्सव हा देशातील एक महत्त्वाचा स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. कला, संस्कृती, संगीत, नृत्य, साहित्य आणि खाद्यसंस्कृतीचा संगम असलेला हा महोत्सव दरवर्षी हजारो कलारसिकांना आकर्षित करतो.

निवड झालेल्या शाळा
- साई जीवन प्राथमिक कन्या शाळा, जाधववाडी
- श्री बापदेव महाराज प्राथमिक शाळा, किवळे
- यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळा क्र. ६०/१, थेरगाव
- श्री वैष्णो माता प्राथमिक विद्यामंदिर, इंद्रायणी नगर, पुणे

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ कलात्मक कौशल्येच नव्हे, तर विचार मांडण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि संघभावना आत्मसात केली आहे. अशा संधी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात.
- विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: ''..तर उद्याच शपथविधी'' सुनेत्रा पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

Crime: भयंकर! अंगावर अनेक वार अन्...; विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला, नेमकं काय घडलं?

शाहरुख खानला सिक्युरिटीने चष्मा काढायला लावल्यावर, किंग खानने केलं असं काही की... पाहा Viral Video

Body Reset Diet: डाएट आणि फिटनेसचं रुटीन वारंवार बिघडतंय का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘रिसेट डाएट’ करून पाहा

Latest Marathi News Live Update : मुंबई-आग्रा महामार्गावर मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

SCROLL FOR NEXT