पिंपरी, ता. १ ः वाहन चालकांमध्ये टायर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे व तांत्रिक माहिती देण्याबाबत ‘इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च’(आयडीटीआर) आणि ‘ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’(एटीएमए) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी आयडीटीआरचे प्राचार्य संजय ससाणे, ॲडव्हाजरी कमिटीचे प्रतिनिधी विनय विजयवर्गीय, टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या रोड सेफ्टी सेलचे प्रमुख सुदर्शन सिंग गुसेन उपस्थित होते.
देशातील आघाडीच्या दहा टायर उत्पादक कंपन्यांची संघटना असलेल्या एटीएमए यांच्या सहकार्याने चालकांपर्यंत टायरची ओळख, टायरचे प्रकार, वर्गीकरण, टायरवरील घर्षण, त्याची कारणे, टायरचे नुकसान होण्यामागील घटक तसेच टायरची योग्य काळजी यासंबंधी तांत्रिक माहिती पोहोचवण्यात येणार आहे. ‘‘वाहनाचा टायर हा वाहनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा तो मुख्य आधार आहे. टायरची योग्य माहिती, देखभाल व वेळेवर बदल केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते.’’असे यावेळी ससाणे यांनी सांगितले. ‘‘टायरचे आयुष्य हे केवळ घर्षणावर अवलंबून नसून टायरवरील क्रॅक्स, टायरचे वय तसेच योग्य हवेचा दाब यावरही अवलंबून असते. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी ठराविक कालावधीनंतर टायर बदलणे अत्यंत आवश्यक आहे.’’ असे सिंग गुसेन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.