पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

स्वच्छतागृहाची दुरवस्था
निगडी प्राधिकरण परिसरातील लोकमान्य हॉस्पिटल येथील पदपथावर सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या स्वच्छतागृहाची अवस्था बकाल झाली आहे. झोपडीसारखी पत्रे ठोकून रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच इतर नागरिक या स्वच्छतागृहाचा वापर करतात. या स्वच्छतागृहाची नियमित सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. येथून ये-जा करताना नागरिकांना नाक बंद करून चालावे लागते. शेजारीच रूग्णालय आहे. येथील ‘अ’ प्रभागाने या समस्येची दखल घेऊन त्वरित ही समस्या सोडवावी.
- दत्ता धामणस्कर, निगडी
PNE26V92684,

रस्त्यांवर साचले कचऱ्याचे ढीग
वाकड येथील श्रीराम मंदिर समोरील रस्त्यावर तसेच पदपथावर कचरा आणि राडारोडा पसरलेला आहे. तसेच या परिसरातील कुबेर चेंबर लगत देखील रस्त्यावर कचरा, घाण, मातीचा ढीग पडलेला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्यास साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने या परिसराची स्वच्छता करावी तसेच कचरा व राडारोडा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी.
- दिलीप बाफना, वाकड

PNE26V92687

उघड्यावर कचरा टाकल्याने आरोग्याचा प्रश्‍न
नवी सांगवी येथील आदर्शनगर मधील लेन नंबर दोन भागात उघड्यावर कचरा टाकला जातो, याबाबत अनेक वेळा संबंधित यंत्रणांना वेळोवेळी कळवूनही ही समस्या सोडविली जात नाही. मागील काही महिन्यांपासून येथील परिस्थिती अवस्था ‘जैसे थे’ आहे. वातावरणातील बदलामुळे उष्मा वाढली त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये थंडी, ताप यांसारख्या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिका प्रशासन आणि नवनिर्वाचीत नगरसेवक यांनी या समस्येची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- एक नागरिक, आदर्शनगर, नवी सांगवी
PNE26V92686

अहिंसा चौक परिसरात दुर्गंधी नित्याची
चिंचवड येथील अहिंसा चौक परिसरात हॉटेल कामिनी समोरील पदपथ तसेच रस्त्याच्या बाजूने चालताना पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या परिसराची पाहणी करून दुर्गंधीच्या कारणाचा तपास करावा व दुर्गंधी येऊ नये यासाठी उपाययोजना करावी.
- मधुकर कांबळे, चिंचवड
-PNE26V92685

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Latest Marathi News Live Update : निळकंठ गार्डन सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर लागली आग

Shani Impact Valentine Day 2026: 'व्हॅलेंटाईन डे' वर शनीचा प्रभाव पडेल; लवर्स 'या' 4 चुका करु नका

NMMC Mayor: नवी मुंबईच्या महापौरपदी विजयी झालेल्या सुजाता पाटील नेमक्या आहेत तरी कोण?

Air Pollution & Mental Health: प्रदूषणामुळे डिप्रेशन-एंग्जायटीचा वाढतोय धोका! हवेतील PM2.5 चा मेंटल हेल्थशी थेट संबंध; तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT